Monday, July 1, 2024

‘रिहर्सलच्या नावाखाली किस करण्याचा प्रयत्न…’, सलमान खानच्या अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच काही नवीन नाही. आपण अनेक सेलिब्रिटींकडून कास्टिंग काऊच बद्दल ऐकले आहेत. यात अनेक मोठमोठ्या कलाकारांची देखील नावे आहेत. हा कास्टिंग काऊचचा विषय नेहमीच समोर येत असतो. मात्र, काही कालावधीनंतर तो मागे पडतो. कास्टिंग काऊच हे फक्त अभिनेत्रीसोबतच घडते असे नाही, अनेक अभिनेत्यांनी सुद्धा याचा सामना केला आहे.

सलमान खानच्या ‘वीर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान सध्या तिच्या एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. झरीन खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतच असते. पण आता झरीनने जो खुलासा केला आहे तो बॉलिवूडचे भयानक आणि घाणेरडा चेहरा दाखवण्यासाठी पुरेसा आहे.

झरीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत झालेल्या विदारक अनुभवाला वाचा फोडली आहे. झरीनने तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल तिच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. यावेळेस ती म्हणाली, “मी इंडस्ट्रीमध्ये नवीनच आली होती आणि मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. मी कोणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. मला एका सीनच्या रिहर्सलच्या (सराव) नावाखाली दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, तुम्हाला तुमचा संकोच दूर करावा लागेल. मी तेव्हा खूपच नवीन होते. काही माहित नव्हते. त्याने मला सांगितले गेले की, आता आपण एका किसिंग सीनचा सराव करू. त्यावर मी म्हणाली काय? नाही नाही मी अशा कोणत्याही किसिंग सीनचा सराव करणार नाही.”

पुढे बोलताना झरीन म्हणाली, “तो मला म्हणाला की, आपण मित्रांपेक्षा अधिक होऊ शकतो. मी तुला काम मिळवायला मदत करेल आणि वैयक्तिकरीत्या मी सर्वात लक्ष घालून तुला मार्गदर्शन करेल. यावर मी त्याला मला असे काम मिळवायचे नाहीये. यानंतर मी तिथून बाहेर पडले.”

झरीन खानने पदार्पण केल्यनानंतर लगेचच तिची तुलना कॅटरिना कैफसोबत होण्यास सुरुवात झाली आणि झरीनच्या करियरला याचा मोठा फटका बसल्याचे देखील झरीनने या मुलाखतीमध्ये सांगितले.

झरीनने आतापर्यंत ‘रेडी’, ‘हाऊसफुल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘वजह तुम हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा