Friday, July 5, 2024

बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेल्या ‘या’ अभिनेत्रीने एक-दोन नव्हे तर केलंय तब्बल ४ वेळा लग्न

अभिनेत्री झेबा ही ९० च्या दशकातील त्या अभिनेत्रींपैकी एक होती जिने बॉलिवूडमध्ये नक्कीच एंट्री घेतली पण तिला इथे काही खास साध्य करता आले नाही. लवकरच ती इंडस्ट्रीतून बाहेर पडली. झेबा बख्तियार (zeba bakhtiar) ‘हिना’ चित्रपटात दिसली होती. माध्यमातील वृत्तानुसार, झेबाला फिल्म इंडस्ट्रीत आणणारे दुसरे कोणी नसून राज कपूर होते. मात्र, या चित्रपटानंतर झेबाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. मात्र, चित्रपटांपेक्षा झेबा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे विशेषत: चार लग्नांमुळे चर्चेत आली आहे.

पाकिस्तानात राहणाऱ्या झेबा बख्तियारने पहिले लग्न सलमान वलियानीसोबत केले होते. या विवाहातून तिला मुलगी झाली. मात्र, लवकरच त्यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

यानंतर जेबा बख्तियारने बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीसोबत (javed jafari) दुसरे लग्न केले. मात्र, हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि लवकरच झेबा आणि जावेद यांचाही घटस्फोट झाला. जावेद जाफरीपासून घटस्फोट घेतल्यानंतर जेबा बख्तियारने गायक अदनान सामीसोबत तिसरे लग्न केले.

माध्यमातील वृत्तानुसार, या लग्नातून त्यांना मुलगा झाला. मात्र, लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. बातम्यांनुसार, जेबा बख्तियारने पाकिस्तानच्या सोहेल खान लेघारीसोबत चौथ्यांदा लग्न केले आहे. झेबा बख्तियार आता तिच्या चौथ्या पतीसोबत पाकिस्तानात राहतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

व्हिडिओ: अभिजित खांडकेकरचा दिसला रोमँटिक अंदाज, पत्नीने ऑन कॅमेरा केलं किस

दीपिका आणि कॅटरिनाबाबत आलियाचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, ‘त्या दोघी मला…’

‘…लंगोट म्हणून बांधलाय’, विशाखाच्या त्या प्रश्नावर पॅडीचं भन्नाट उत्तर, व्हिडिओ पाहून खदखदून हसाल

हे देखील वाचा