Saturday, August 2, 2025
Home अन्य तब्बल २७ वर्षांनी एकत्र आले गोविंदा- शक्ती कपूर; ‘राजा बाबू’ मधील ‘तो’ सीन रीक्रिएट करत प्रेक्षकांना केले लोटपोट

तब्बल २७ वर्षांनी एकत्र आले गोविंदा- शक्ती कपूर; ‘राजा बाबू’ मधील ‘तो’ सीन रीक्रिएट करत प्रेक्षकांना केले लोटपोट

आपण अनेकदा चित्रपटांमध्ये बघतो की, मुख्य अभिनेत्यासोबतच एक सहायक अभिनेता असतो. हा अभिनेता नायकाचा मित्र, भाऊ आदी भूमिकांमध्ये दाखवला जातो. आजपर्यंतचे आपण सिनेमे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अशा अनेक जोड्या हिट ठरल्या आहेत. गोविंदाच्या तर प्रत्येक चित्रपटात त्याच्यासोबत एक अभिनेता असायचाच. गोविंदाचा असाच एक चित्रपट म्हणजे ‘राजा बाबू.’ डेव्हिड धवन दिग्दर्शित हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झाला. सिनेमा तर तुफान गाजला, सोबतच सिनेमातील प्रत्येक पात्र आणि त्यांच्या भूमिका देखील सुपरहिट झाल्या.

‘राजा बाबू’ सिनेमात प्रेक्षकांना गोविंदा आणि करिश्मा कपूर या जोडीसोबत अजून एक धमाल जोडी पाहायला मिळाली आणि ती जोडी म्हणजे, गोविंदा आणि शक्ती कपूर यांची. करिश्मा आणि गोविंदा यांच्यापेक्षा जास्त शक्ती कपूर आणि गोविंदा यांची जोडी जास्त गाजली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या जोडीने चित्रपटात रसिकांना पोट धरून हसवले. या सिनेमाचे गोविंदा आणि शक्ती कपूर एक मोठे आकर्षण आणि वैशिष्ट होते. या चित्रपटानंतर अशी आयकॉनिक जोडी पुन्हा पाहायला मिळालीच नाही. आता तुम्ही म्हणाल आज इतक्या वर्षांनी अचानक या जोडीबद्दल का सांगत आहात? तर या जोडीचा एक धमाकेदार परफॉर्मन्स बघण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. तब्बल २६ वर्षांनी एकाच स्टेजवर शक्ती कपूर आणि गोविंदा त्यांचा या सिनेमातील एक ऍक्ट सादर करताना पाहायला मिळणार आहे. (govinda and shakti kapoor recreate their iconic raja babu scene)

झी टीव्हीवर नव्यानेच सुरु झालेला ‘झी कॉमेडी शो’मध्ये आपल्याला हा ऍक्ट पाहायला मिळणार आहे. फराह खानचा हा शो काही दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. भारतातील टॉपचे कॉमेडियन या शोच्या माध्यमातून लोकांना पोट धरून हसवतात. या आठवड्यात या कॉमेडीयनसोबतच गोविंदा आणि शक्ती कपूर देखील त्यांच्या मजेशीर सादरीकरणाने सर्वाना हसवणार आहे.

स्वतंत्र्यदिन विशेष भागात गोविंदा आणि शक्ती कपूर यांनी या शोमध्ये हजेरी लावली. या भागात सर्व कॉमेडियन ‘टीम हंसाएंगे’ बनत सर्वांना हसवणार आहेत. सर्व कॉमेडीयन्सचे मजेशीर ऍक्ट, फराह खानची हजरजबाबी आणि गोविंदा आणि शक्ती कपूर यांचे सादरीकरण हे पाहून शोमधील सर्वच लोकं ‘हंसी ऑन, स्ट्रेस गॉन’ मूडमध्ये दिसत असल्याचे आपल्याला नक्कीच जाणवेल. या खास भागात गोविंदा राजा बाबू आणि शक्ती कपूर नंदू बनत सर्वांना हसवणार आहेत. यावेळी या दोघांनी त्यांच्या या भूमिकेचा पोशाखही परिधान केला होता.

त्यांच्या या ऍक्टने सर्वांच्याच सिनेमाबद्दलच्या आठवणींना ताजे केले. हा ऍक्ट पाहून सर्व जणं भावनिक देखील झाले. फराहने तर हा या ऍक्टला ऐतिहासिक क्षण म्हणून देखील संबोधले. या आठवड्यात हा भाग प्रसारित केला जाणार आहे, तेव्हा सर्वानीच हा भाग बघा आणि या ऍक्टचे साक्षिदार व्हा.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवींनी अवघ्या ४ वर्षांच्या वयात ठेवले होते फिल्मी दुनियेत पाऊल; बॉलिवूडमध्ये घ्यायच्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक फी

अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

झी मराठीवरील ‘या’ मालिकेत तिहेरी भूमिकेत झळकणार संकर्षण कऱ्हाडे, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

हे देखील वाचा