Monday, February 24, 2025
Home अन्य अरे बापरे! लग्नाच्या केवळ पाचच महिन्यात सुगंधा मिश्राच्या नवऱ्याची झाली अशी गत, पाहा हा व्हिडिओ

अरे बापरे! लग्नाच्या केवळ पाचच महिन्यात सुगंधा मिश्राच्या नवऱ्याची झाली अशी गत, पाहा हा व्हिडिओ

‘द कपिल शर्मा शो’ची कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट आणि गायिका सुगंधा मिश्राने याचवर्षी २६ एप्रिल रोजी कॉमेडियन आणि अभिनेता असणाऱ्या संकेत भोसलेशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. त्यांच्या लग्नामध्ये कुटुंबाशिवाय अनेक खास मित्रही उपस्थित होते. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. लग्नानंतरही सुगंधा आणि संकेत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे ते सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात आणि फॅन्सच्या संपर्कात राहतात. नुकताच संकेत भोसलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

झी कॉमेडी शोचा हा व्हिडिओ फराह खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फरहसोबत तापसी पन्नू देखील दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले आहे की, “सगळे वेडे झाले आहेत. संकेतने स्वत: चा त्याचे काहीतरी तयार केले आहे.” संकेत भोसलेचा हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात असून, चाहते या व्हिडिओवर सतत कमेंटही करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहेत. अभिनेत्री तब्बूलाही त्याचा हा व्हिडिओ आवडला आहे.

संकेत भोसलेच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘लग्नानंतर मुलगा अजूनच खतरनाक झाला आहे.” एका चाहत्याने त्याला हास्यास्पद म्हटले आहे, तर काही लोक नुसरत फतेह अली खानची खिल्ली उडवल्याच्या गोष्टीवर देखील नाराज झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखांहून हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

‘झी कॉमेडी शो’च्या तापसी पन्नूच्या भागात संकेत भोसलेचा नुसरत फतेह अली खान लूक दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू या शोमध्ये चित्रपट दिग्दर्शक फराह खानसोबत दिसणार आहे. ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तापसी या शोमध्ये पोहोचली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर अतिशय दमदार असून, या सिनेमात तापसी तिच्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

हे देखील वाचा