Saturday, January 17, 2026
Home मराठी ‘मराठी मनात, मराठी घरात’ म्हणत मराठी चित्रपटांसाठी नवं क्षितिज खुलं करणारी वाहिनी आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘मराठी मनात, मराठी घरात’ म्हणत मराठी चित्रपटांसाठी नवं क्षितिज खुलं करणारी वाहिनी आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाची मराठी चित्रपटांशी एक विशेष नाळ जोडलेली आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा आज जगभर डंका वाजतो आहे. भारतीय चित्रपटसृष्टी, तिथले कलाकार आणि झी समूह हे जसं एक घट्ट नातं बनलंय. तसंच मराठी चित्रपट रसिक आणि झी टॉकीज हेही एक अनोखं नातं आज आपल्या प्रत्येकालाच पाहायला मिळतंय. याच अनोख्या नात्याची वीण आणखी घट्ट करत झी समूहाने आता आणखी एक पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जिथे फ्री डिश जास्त प्रमाणात बघितली जाते तेथील रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. झी समूह आता घेऊन येत आहे आणखी एक नवीकोरी मराठी चित्रपट वाहिनी जी फक्त फ्री डिशवर उपलब्ध असेल.

“मराठी मनात, मराठी घरात” म्हणत मराठी चित्रपटांसाठी नवं क्षितिज खुलं करणाऱ्या या नव्या वाहिनीचं नाव असेल झी चित्रमंदिर. झी समूहाच्या प्रत्येक वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच झी समुहाच्या प्रत्येक वाहिनीचं मराठी रसिक, कलाकार, पडद्यामागील तंत्रज्ञ या सर्वांशी एक घट्ट नातं तयार झालंय. झी समुहाची हीच परंपरा पुढे नेत प्रेक्षकांना आता आणखी नवं काहीतरी देण्यासाठी ‘झी चित्रमंदिर’ या फ्री डिश वाहिनीच्या रुपाने सज्ज झाली आहे. मराठी चित्रपटांशी संपूर्णपणे वाहून घेतलेली ही नवीकोरी वाहिनी असेल जिथे प्रेक्षकांना गाजलेल्या चित्रपटांसोबत कीर्तनाचा मनमुराद आनंद घेता येईल. फ्री डिश वरती ‘झी चित्रमंदिर’ या वाहिनीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी सेट टॉप बॉक्सला री ट्यून/ ऑटो ट्यून करणे गरजेचे आहे.

या नव्या येणाऱ्या वाहिनीबद्दल सांगताना या वाहिनीचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, ” झी टॉकीज या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी म्हणून पसंती मिळवलेल्या चित्रपट वाहिनीला प्रक्षकांनी भरपूर प्रेम दिले. आपल्या महाराष्ट्र राज्यात फ्री डिश बघणारा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्यांना उत्तमोत्तम चित्रपटांचा तसेच, कीर्तनाचा आनंद मिळावा हा झी चित्रमंदिर वाहिनीचा प्रमुख उद्देश असणार आहे. झी टॉकीज प्रमाणेच झी चित्रमंदिर या वाहिनीला सुद्धा महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील हा आम्हाला विश्वास आहे. मराठी मनात, मराठी घरात हे आमचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल अशी आम्हाला आशा आहे.

‘झी चित्रमंदिर’ ही वाहिनी ९ एप्रिल, २०२१ पासून दररोज नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीने केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर, म्हणाली ‘…तयार आहे’

-हॉट अभिनेत्री सनी लिओनीने कोरोना काळातही मुंबईत खरेदी केले पाच BHK लक्झरी अपार्टमेंट, किंमत वाचून व्हाल हैराण

-अभिनेता संजय कपूरच्या पोरीनं ‘या’ बाबतीत सोनम अन् जान्हवीलाही टाकलंय मागं, लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण

हे देखील वाचा