विनोद हा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचा भाग आहे. विनोदाशिवाय कोणताही प्रयोग सहसा यशस्वी होत नाही. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अस्सल हाडाचे विनोदी कलाकार होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर समस्त प्रेक्षक वर्गाला हास्याच्या महासागरात नेऊन सोडले होते. आजही त्यांचे चित्रपट पाहताना कधी कंटाळा येत नाही. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे दिवंगत अभिनेते दादा कोंडके होय. त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने सगळ्यांना खळखळून हसवले आहे. या महान अभिनेत्याच्या स्मरणार्थ मराठीमध्ये लवकरच एक नवीन चित्रपट येणार आहे. जो विनोदवीरांची गाथा सांगणार आहे.
अभिनेता भालचंद्र कदम अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडक्या भाऊ कदमने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्याने त्यांच्या नवीन ‘पांडू’ या चित्रपटाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला दिवंगत अभिनेते दादा कोंडके दिसत आहेत. तसेच नंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची जोडी दिसत आहे. त्या दोघांनीही हवालदाराच्या ड्रेस घातला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘दादा परत या ना’ हे गाणे लागले आहे. (Zee studios pandu movie will release on 3 December 2021)
हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “डोक्यावर घालून टोपी आणि हातात घेऊन दांडू. ३ डिसेंबरला थेटरात विनोदाचा धमाका करायला येतोय झी स्टुडिओजचा नवा सिनेमा पांडू.”
त्यांच्या या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विजू माने हे आहेत. तसेच या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते यांनी गायली आहेत. चित्रपटाचा प्रोमो पाहून तर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच चित्रपटात नक्की काय असणार आहे, हे आपल्याला ३ डिसेंबरला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील एक लोकप्रिय जोडी आहे. या शोमधील त्यांची कॉमेडी जगभर पसरली आहे. त्यामुळे आता या नवीन चित्रपटात ते नक्की काय धमाल करणार आहेत. हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-निलेश साबळेचा होणार पत्ता कट, ‘ही’ अभिनेत्री करणार ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालन?
-शिव ठाकरे अन् जुईली वैद्यच्या डान्सवर टायगर श्रॉफही झाला फिदा, कमेंट करत म्हणाला…
-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री