कलाकार नेहमी वेगवेगळ्या प्रकारे आपले रिलेशनशिपबाबत घोषणा करत असतात. कुणी आपल्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर करून, कुणी सोशल मीडियावर नोट लिहून, तर कुणी जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली देतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. टीव्ही अभिनेता जीशान खानने ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील सहकलाकार रेहाना पंडितसोबतच्या आपल्या नात्याच्या अफवांना पूर्णविराम लावला आहे. त्याने रोमँटिक फोटो शेअर करत आपले नाते अधिकृत केले आहे. त्यांचा हा लिपलॉक फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
बुधवारी (०६ ऑक्टोबर) जीशानने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर रेहानाला किस करतानाचा एक फोटो शेअर करत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. यासोबतच त्याने एक रोमँटिक नोटही लिहिली आहे. (Zeeshan Khan And Reyhna Pandit Announced Their Relationship Liplock Photo Viral)
जीशानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या जिवलग मित्रापासून माझ्या जीवनाचे प्रेम होण्यापर्यंत, माझ्या आनंदापासून माझ्या मनाची शांती होण्यापर्यंत! मला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तू आहेस आणि त्याहूनही अधिक! प्रत्येक क्षण मी तुझ्याबरोबर घालवतो, प्रत्येक श्वास घेतो, तुझी उपस्थिती माझे हृदय प्रेमाने भरते. असे वर्णन केवळ परिकथांमध्ये आढळते, आणि हो मला माहित आहे की, असे लोक आहेत जे स्वतःवर शंका घेतात. त्यांना समजले की, या प्रकारचे प्रेम खरे असू शकत नाही. खरं तर, लोक त्यावर विश्वास ठेवत नाही, जे त्यांना वाटते की, त्यांच्याकडे नसू शकते.”
जीशानने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “प्रत्येकाला माझ्या प्रेम जाणवले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. कारण काहीतरी जादुई गोष्ट, एखाद्या परिकथेपेक्षा कमी नाही. तू माझी मुलगी आहेस आणि मला संपूर्ण जगाला सांगायचे आहे की तू माझी मुलगी आहेस, मला प्रत्येकाला सांगायचे आहे की तू माझी मुलगी आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो बेबी बन्स.”
रेहानाने कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केलेली नाही. मात्र, तिने जीशानच्या पोस्टवर कमेंट करत एक सुंदर मेसेज लिहिला आहे. तिने लिहिले की, “शाई माझे तुझ्यावर प्रेम आहे. धन्यवाद बेबी माझ्यावर सदैव प्रेम करण्यासाठी.”
रेहाना आणि जीशानच्या या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर










