टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच स्पर्धक झीशान खानला बाहेर काढावे लागले आहे. होय, हे खरे आहे. आजच्या एपिसोडमध्ये प्रतिक सहजपाल आणि निशांत भट्ट यांच्याशी झालेल्या भांडणात गैरवर्तन करणे झीशान खानला चांगलेच महागात पडले.
खरं तर, ही घटना आज एका टास्क दरम्यान घडली आहे. जेव्हा झीशानने निशांतकडून त्याच्या गोष्टी जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रतीक त्यांच्यामध्ये आला आणि झीशानला असे करू नको, असे सांगू लागला. नुकतीच घरातील भांडणाची ही फुटेज समोर आली आहे. (zeeshan khan evicted from bigg boss ott house after violent fight with pratik and nishant and then shows injuries on instagram)
या फुटेजमध्ये शर्टलेस झीशान रागात निशांतच्या हातातून झेंडे हिसकावून घेताना दिसत आहे. प्रतीक त्यांना असे करण्यापासून रोखतो, पण झीशान ऐकत नाही. जेव्हा प्रतिक आणि निशांत एकत्र मिळून झीशानच्या वागण्याचा निषेध करतात, तेव्हा त्यांच्यात हाणामारी होते.
Woah Woah Hinsa!!
Kya Zee ko mili sahi saza for his behaviour?
Watch #BiggBossOTT 24×7 Live only on #VootSelect.#ItnaOTT #BBOtt #BiggBossOTT #BBOttOnVoot #BBOtt24x7 #Voot #SalmanKhan #KaranJohar pic.twitter.com/RlHBf9aCsN— Voot Select (@VootSelect) August 25, 2021
Kya aapko bhi lagta hai Zeeshan ne iss baar kar di hadh paar?????
Comment and tell us!Watch #BiggBossOTT 24×7 Live only on #VootSelect.#ItnaOTT #BBOtt #BiggBossOTT #BBOttOnVoot #BBOtt24x7 #Voot #SalmanKhan #KaranJohar pic.twitter.com/UOdoUZbSBW
— Voot Select (@VootSelect) August 25, 2021
झीशानच्या जाण्याने रडू लागली दिव्या
त्यानंतर बिग बॉसने झीशानला बाहेर काढल्याची घोषणा केली. हे ऐकून प्रतीकला खूप आनंद झाला. त्याचवेळी, झीशानचे कनेक्शन असलेली दिव्या त्याला शांत करताना दिसते आणि तो घरातून गेल्यानंतर की खूप रडते.
ZEESHAN HUE GHAR SE BEGHAR!????????
Kya Bigg Boss ka yeh faisla tha sahi?Watch #BiggBossOTT 24×7 Live only on #VootSelect.#ItnaOTT #BBOtt #BiggBossOTT #BBOttOnVoot #BBOtt24x7 #Voot #SalmanKhan #KaranJohar pic.twitter.com/5bQAo8KV9c
— Voot Select (@VootSelect) August 25, 2021
झीशानच्या समर्थनार्थ आले चाहते
घरी परतल्यानंतर झीशानने इंस्टाग्राम अकाऊंटवर, त्याला झालेल्या दुखापतीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या हातावरील आणि छातीवरील ओरखड्यांचे निशाण सहज पाहायला मिळत आहेत. हे पाहून एका युजरने लिहिले, “हे पूर्णपणे चुकीचे आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “आम्ही तुझ्यासोबत आहोत.” असे म्हणत झीशानचे चाहते त्याच्या समर्थनार्थ आले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर