Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड देशी गाण्यावर विदेशी अभिनेत्रीने लावले ठूमके, स्पायडरमॅनची ‘गर्लफ्रेंड’ झेंडायाने केला ‘मुन्नी बदनाम’वर डान्स

देशी गाण्यावर विदेशी अभिनेत्रीने लावले ठूमके, स्पायडरमॅनची ‘गर्लफ्रेंड’ झेंडायाने केला ‘मुन्नी बदनाम’वर डान्स

मागच्या महिन्यात 31 मार्चला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्धघाटन साेहळा पार पडला. या साेहळ्यात देश-विदेशातील कलाकार, नेते, क्रीडा आणि व्यावसायिक व्यक्तींनी त्यांच्या उपस्थितीने सांस्कृतिक कार्यक्रमात चार चांद लावले. या कार्यक्रमातील हॉलिवूड अभिनेत्री झेंडायाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हॉलिवूड अभिनेता टॉम हॉलंडच्या ‘स्पायडर मॅन’ या चित्रपटात झेंडायाने पीटर पार्करच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिने सर्वांची मने जिंकली होती. अभिनेत्री झेंडायाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये परदेशी अभिनेत्रीचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.

हॉलिवूड अभिनेत्री झेंडायाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये झेंडायाचा लूक पूर्णपणे देसी आहे. तिने एनएमएसीसी इव्हेंटमध्ये रॉयल ब्लू कलरमध्ये अतिशय सुंदर डिझायन केलेली साडी परिधान केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Glamour Alert (@glamouralertofficial)

याव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान खान स्टारर ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. त्याचवेळी झेंडेया पाठ फिरवून त्यावर चालताना दिसत आहे. झेंडायाच हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सला खूप आवडला आहे.

एनएमएसीसी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन साेहळ्यात भारतरत्न सचिन तेंडुलकर, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, लॉन टेनिसपटू सानिया मिर्झा, अॅथलीट दीपा मलिक, सुपरस्टार रजनीकांत, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, सोनम कपूर, अनूप खपूर, अनोखे यांचा समावेश आहे. जावेद अख्तर, शबाना आझमी, सुनील शेट्टी, शाहिद कपूर, विद्या बालन, आलिया भट्ट, दिया मिर्झा, श्रद्धा कपूर, श्रेया घोषाल, राजू हिरानी, ​​तुषार कपूर असे अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. हॉलिवूडबद्दल बोलायचे झाले, तर एम्मा चेंबरलेन, गिगी हदीद यासारख्या स्टार्सही या कार्यक्रमात सहभागी झाले हाेते.(zendaya grooving dance on salman khan movie dabangg song munni badnaam in nita mukesh ambani cultural centre video goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान भाईजानने उचलले माेठे पाऊल; थेट विदेशातून खरेदी केली ‘ही’ बुलेटप्रूफ कार, फाेटाे व्हायरल

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

हे देखील वाचा