Thursday, November 21, 2024
Home अन्य माझ्या मुलांसाठी मी स्वतः जेवण बनवते; अनुष्काने सांगितली तिच्या कुटुंबाची दिनचर्या…

माझ्या मुलांसाठी मी स्वतः जेवण बनवते; अनुष्काने सांगितली तिच्या कुटुंबाची दिनचर्या…

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील सर्वात पसंत केले गेलेले जोडपे आहे. एका मुलाखतीदरम्यान अनुष्काने सांगितले की, ती स्वत: तीच्या दोन्ही मुलांसाठी वामिका आणि अकायसाठी जेवण बनवते. 

नुकतीच अनुष्का शर्मा लंडनहून भारतात परतली. सकाळी विमानतळावर अनुष्का अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान अनुष्काने तिच्या कौटुंबिक जीवनाबद्दल मोकळेपणाने सांगितले. अनुष्काने खुलासा केला की ती आणि तिचा नवरा, क्रिकेटपटू विराट कोहली, त्यांच्या मुलांसाठी वामिका आणि अकाय यांच्यासाठी स्वतः जेवण कसे बनवतात. जेवणाबरोबरच ते आपली मुलांची दिनचर्या व्यवस्थित राखण्यावर विशेष भर देतात. 

कार्यक्रमादरम्यान अनुष्का म्हणाली, “आमच्या घरात एक चर्चा झाली की, आमच्या आईने जसे आमच्यासाठी अन्न बनवले ते आम्ही बनवले नाही, तर आम्ही आमच्या मुलांना कुटुंबातील जेवणाची ही स्पेशल रेसिपी देऊ शकणार नाही. त्यामुळेच कधी मी स्वयंपाक करते तर कधी माझा नवरा विराट स्वयंपाक करतो.” अनुष्का पुढे म्हणाली, ”आम्ही आमची आई जशी स्वयंपाक करायची तसाच स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मी थोडी चिटिंग सुद्धा करतो, आईला फोन करून रेसिपी विचारते.

अनुष्का म्हणाली, “मी माझ्या दिनचर्येबाबत खूप शिस्तबद्ध आहे. आम्ही खूप प्रवास करतो आणि या काळात माझ्या मुलांना खूप बदल जाणवतात. म्हणूनच मी त्यांच्यासाठी दिनक्रम बनवते, जेणेकरून ते दोघेही निट राहतील. वामिका आणि अकाय यांची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. आम्ही ठराविक वेळी अन्न खातो आणि ठराविक वेळी झोपतो.

यावेळी अनुष्का तिची मुले आणि पती विराट कोहलीशिवाय भारतात परतली आहे. मुलगा अकायच्या जन्मानंतर तिची ही दुसरी भारतभेट आहे. यापूर्वी ती मे महिन्यात आयपीएलसाठी भारतात आली होती. 

कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०१८ च्या ‘झिरो’ नंतर अनुष्का कोणत्याही चित्रपटात दिसली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की ती क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या स्पोर्ट्स बायोपिक ‘छकडा एक्सप्रेस’मधून पुनरागमन करेल. ‘चकडा एक्स्प्रेस’चे शूटिंग पूर्ण झाले असून चाहते रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –  

मला जाड असण्याबाबत हिणवले गेले; ईशा देओलने सांगितल्या करीयरच्या सुरुवातीच्या आठवणी…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा