Saturday, June 29, 2024

चित्रपट माफियांना ‘भिकारी’ म्हणत पुन्हा एकदा कंगना रणौतने साधला माफियांवर निशाणा

हिंदी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारणारी कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळेच जास्त गाजताना दिसते. कंगना नेहमीच बॉलिवूडसोबतच आजूबाजूच्या सर्वच घडणाऱ्या घटनांवर तिचे मत व्यक्त करत असते. मागे बऱ्याचदा तिने बॉलिवूडच्या फिल्म माफियांवर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा तिने त्यांना टार्गेट केले आहे. कंगना सध्या तिच्या गामी इमर्जन्सी सिनेमामुळे चांगलीच लाइमलाईट्मधे आहे. अशातच तिची काही दिवसांपूर्वी ट्विटरवर वापसी देखील झाली. या सर्व गोष्टींमुळे ती प्रकाशझोतात असताना देखील ती काही पंगा घेतल्याशिवाय राहत नाही.

कंगनाने नुकतेच तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने चित्रपट माफियांबद्दल लिहिले असून, त्यांना भिकारी देखील म्हटले आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “भिकारी चित्रपट माफियांनी माझ्या अटीट्युडला माझा गर्व म्हटले आहे. कारण मी इतर मुलींप्रमाणे त्याच्या होकारात माझा होकार नाही मिळवला, लग्नात नाही नाचली, रात्री हिरोने रूममध्ये बोलावल्यानंतर मी कधीच गेली नाही. या सर्व गोष्टींना मी सतत नकार दिला. ते मला वेडी असल्याचे सिद्ध करून मला जेलमध्ये बंद करायचे ठरवत आहे.”

कंगना रणौतने तिच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, “ही वागणूक आहे की प्रामाणिकपणा, स्वतःला सुधरवण्यापेक्षा मला सुधरवायला निघाले आहे. मात्र खरी बाब ही आहे की, मला स्वतःसाठी काहीच नको. मी आता स्वतःचे सर्व गहाण ठेऊन एक सिनेमा बनवला आहे, राक्षसांचा नायनाट होईल. यासाठी कोणीच मला दोष देऊ नका” यात कंगनाने कुठेही कोणत्याच विशिष्ट व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. ती सध्या तिच्या इमर्जन्सी सिनेमामुळे गाजत असून, या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन तिने केले असून, यात इंदिरा गांधींची भूमिका देखील कंगनानेच केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबई सोडण्यापूर्वी ऋतिकने पॅपराझींसमाेर साबा आझादला केले किस, व्हिडिओ व्हायरल

‘ड्रामाक्विन’ शिकवणार अभिनय? राखीने अकादमीसाठी उचलले माेठे पाऊल, एकदा व्हिडिओ पाहाच

 

हे देखील वाचा