Sunday, June 23, 2024

‘ड्रामाक्विन’ शिकवणार अभिनय? राखीने अकादमीसाठी उचलले माेठे पाऊल, एकदा व्हिडिओ पाहाच

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत हिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार सुरु आहेत. मात्र, आता ती तिच्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत करुन पुन्हा कामावर परतली आहे. सध्या राखी एका म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करत आहे. इतकंच नाही, तर पती आदिल खान दुर्रानीसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती दुबईत तिची एक्टिंग अॅकेडमीही उघडत आहे. ही अकादमी बॉलीवूडमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणार आहे. यासाठी राखी दुबईला रवाना झाली आहे. जेव्हा राखीची आई आजारी होती, त्याचवेळी राखीने अकादमीच्या स्वप्नांविषयी सांगितले हाेते, पण आता तिचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.

याबाबत माहिती देताना राखी सावंत (rakhi sawant) म्हणाली, ‘मी al Karama मध्ये एक अकादमी उघडली आहे, जी देशांतील इच्छुक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षण देईल. राखी सावंत आजकाल जे काही करत आहे, त्यावर काही चाहते तिला पाठिंबा देत आहेत, तर अनेक जण तिला ट्राेल करत आहेत. ती केवळ ड्रामा करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर अनेकांना तिची खंत वाटत आहे. अशात राखी सध्या तिच्या लेटेस्ट म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

गेल्या आठवड्यात राखीला अनेक कारणांवरुन ट्राेल केले गेले. ती म्हैसूरमध्ये आदिल खानच्या आई-वडिलांच्या घरी गेली असता तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले हाेते, ज्यामध्ये ती कधी आदिलला ‘टक्कल’ तर कधी ‘ड्रायव्हर’ म्हणत आहे. राखी सावंत अखेरची बिग बॉस शोमध्ये दिसली हाेती. राखी तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी माेठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिला ‘ड्रामाक्विन’ म्हणूनही ओळखले जाते.(bollywood actress rakhi sawant will open acting academy in dubai amid legal battle with adil-khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करियरच्या पहिल्या 10 वर्षांमध्ये अक्षय कुमारले कमावले होते केवळ ‘इतके’ रुपये, स्वतःच केला खुलासा

शहनाज गिलविरोधात ट्विट केल्याने ट्रोल झाली सोना महापात्रा; चाहते म्हणाले, ‘फुटेज हवे असेल तर…’

हे देखील वाचा