Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अमाप प्रसिद्धी मिळवूनही ‘या’ अभिनेत्रींनी सोडली चंदेरी दुनिया, वाचा संपूर्ण यादी

बॉलिवूडमध्ये दर आठवड्यात नवीन चित्रपट येतात आणि दर महिन्यात आपल्याला एक नवीन चेहरा पाहायला मिळतो.  बॉलिवू़डसारख्या इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करणे खूपच कठीण असते. आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून आहोत, ज्या 90 च्या दशकात खूप कमी वेळात लोकप्रिय झाल्या आणि तेवढ्याच लवकर गायबही झाल्या. त्यांनी स्टारडम सोडून वेगळेच आयुष्य निवडले आहे. जाणून घेऊया या अभिनेत्री सध्या काय करत आहेत.

नगमा
नगमा (Nagma) ही 90 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जात होती. तिने सलमान खानसोबत चित्रपट ‘बागी’ पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि तिला ‘बादशाह’, ‘सुहाग’ सारख्या गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम मिळाले होते. यानंतर तिने बॉलिवूड व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र, या अभिनेत्रीने स्टारडम करिअरला सोडले आणि आता ती राजकारणात आपली ओळख निर्माण करत आहे.

नम्रता शिरोडकर
1993 मध्ये फेमिना इंडियाचा किताब जिंकून नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar)ने आपली ओळख निर्माण केली होती. यानंतर ती 1998 मध्ये अभिनय क्षेत्रामध्ये उतरली. तिने चित्रपट करिअरची सुरुवात सलमान खानसोबत जब ‘प्यार किसीे से होता हैं’ या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तिने ‘कच्चे धागे’, ‘पुकार’ आणि ‘लॉक कारगिल’ सारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र 2004 मध्ये तिने अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला. आणि फेब्रुवरी 2005 मध्ये साउथ सुपरस्टार महेश बाबूसोबत विवाह केला.

शबाना रजा
शबाना रजा(Shabana Raza) उर्फ बाजपेयी या अभिनेत्रीने 1998 मध्ये बॉबी देओल(Boby Deol) सोबत ‘करीब’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2006 मध्ये अभिनेता मनोज(Manoj Bajpayee)  बाजपेयीसोबत विवाह केला. शबाना रजा या अभिनेत्रीने 2009 मध्ये शेवटचा चित्रपट ‘एसिड फॅक्ट्री’ केला होता. यानंतर तिने अभिनय क्षेत्राला गुड बाय केलं.

अनु अग्रवाल
अनु अग्रवालने (Anu Agarwal)1990 मध्ये आपल्या करिअची सुुरुवात केली होती. तिने पहिला चित्रपट ‘आशिकी’ राहुल रॉयसोबत केला होता. या चित्रपटामुळे तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. ज्यामुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, नशिबाने तिला साथ दिली नाही आणि एका अपघातामुळे तिला बॉलिवूडला अलविदा करावे लागले.

ममता कुलर्णी
लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये जर ममता कुलकर्णी(Mamta Kulkarni)चे नाव नसेल तर ती यादी अपूर्णच आहे. असे मानावे लागेल. 90 च्या दशकामध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक खास ओळख निर्माण केली होती. मात्र या अभिनेत्रीने ड्रग माफिया अ्सणाऱ्या विक्की गोस्वमीसोबत विवाह करुन आपल्याच पायावर दगड मारुन घेतला आणि बॉलिवूडसोबत देशालाही सोडावे लागले. तिने शेवटी 2002 मध्ये ‘कभी तुम कभी मै’ या चित्रपटात काम केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
शेतात काम करणारी ६२ वर्षीय आजी ‘अशी’ बनली युट्युबर, वाचा तिची कहाणी
अभिनेत्री बनण्यासाठी घरातून गेल्या होत्या पळून, ‘असा’ आहे उष
ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर हिट, पण आलिया भट्टला का मागावी लागली मीडियाची माफी? व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

 

हे देखील वाचा