वयाच्या १६ व्या वर्षी नगमाने केला सलमानसोबत डेब्यू; लोकप्रियता इतकी की, चाहत्यांनी बांधले होते मंदिर


नव्वदच्या दशकात अभिनेत्री नगमाने ‘बागी’ चित्रपटातून सलमान खानची नायिका म्हणून चित्रपट पडद्यावर पाऊल ठेवले. नगमाने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे प्रेम मिळवले. नगमा शुक्रवारी (२५ डिसेंबर) तिचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग नगमाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

नगमाचा जन्म २५ डिसेंबर, १९७४ रोजी मुंबईत झाला होता. नगमाचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे. नगमाचे वडील अरविंद प्रताप सिंग मोरारजी हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तिला चित्रपटसृष्टीत नगमा हे नाव मिळाले आहे.

‘बागी’ या चित्रपटातून सलमानची नायिका म्हणून चित्रपट पडद्यावर पाऊल ठेवले, तेव्हा ती अवघी १६ वर्षांची होती. इतर काही मोजक्याच अभिनेत्रींप्रमाणे ती खूप कमी वयात चित्रपटसृष्टीत आली होती.

नगमाचा (Nagma) सलमानसोबतचा (Salman Khan) ‘बागी’ हा १९९० मधील सर्वाधिक कमाई करणारा सातवा हिंदी चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशामुळे नगमाला चित्रपटांसाठी खूप ऑफर मिळू लागल्या.

एका रात्रीत स्टार बनल्यानंतर नगमाने ‘सनम बेवफा’, ‘पोलिस और मुजरिम’, ‘किंग अंकल’, ‘सुहाग’, ‘एक रिश्ता’, ‘कुंवरा’, ‘तुम्हारे हवाले वतन साथीयो’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. काही चित्रपट चांगले चालले, पण नगमाची कारकीर्द काही विशेष उंचीवर पोहोचली नाही.

हिंदीसोबतच नगमाने तिची मैत्रीण दिवंगत अभिनेत्रीच्या सांगण्यावरून दक्षिण चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि तिथे बंपर यश मिळवले. माध्यमांतील वृत्तानुसार, तामिळनाडूमध्ये नगमाची लोकप्रियता इतकी होती की, तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नावाने मंदिर बांधले होते.

भोजपुरी चित्रपटातही काम केले आणि त्यानंतर अभिनयातून निवृत्ती घेतली. नगमाने शेवटचे भोजपुरी चित्रपट ‘जनम जनम’मध्ये काम केले होते. रवी किशनसोबत तिची जोडी खूप जमली होती.

विशेष म्हणजे, तिचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीशी जोडले गेल्याचे बोलले जाते. सौरव आणि नगमा प्रेमात असल्याच्या चर्चा तुफान गाजल्या होत्या.

फिल्मी दुनियेत काम केल्यानंतर नगमा राजकीय क्षेत्रात पोहोचली आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील मेरठ-हापूड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

नगमा प्रचारासाठी बाहेर पडली की, तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. सध्या ती काँग्रेस पक्षात पूर्णपणे सक्रिय आहे. नगमा केवळ सुंदरच नाही, तर खूप प्रतिभावानही आहे.

विशेष म्हणजे ती अजूनही अविवाहित आहे. तिने हिंदी, भोजपुरी, पंजाबी, तमिळ-तेलुगू अशा १० भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!