Tuesday, June 18, 2024

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरी झाली चोरी, 10 तोळे सोन्यासह चोरट्यांनी पैसे केले लंपास

मराठी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मिती श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिच्या घरावर दरोडा पडलेला आहे. अभिनेत्रीच्या सातारा शहरातील असलेल्या घरात चोरी केलेली आहे. अभिनेत्री तिच्या आईसोबत इथे राहत असते. पण सध्या मालिकेच्या शूटिंगमुळे शेता मुंबईला आली होती. तिच्या घरात चोरी झाली तेव्हा ती घरी नव्हती.

अभिनेत्रीच्या घरी चोरट्यांनी दहा तोळे सोन्याची चोरी केलेली आहे. आणि काही रोख रक्कम देखील चोरी केली आहे. चोरी झाल्यानंतर त्या चोरट्यांनी अभिनेत्रीचे कपाट देखील जाळून टाकले आहे. अभिनेत्रीच्या घरी चोरी झाल्यानंतर पिरवाडी परिसरात चांगलीच खळबळ उडालेली आहे. या घटनेनंतर अभिनेत्रीने पोलीसमध्ये FRI नोंदवलेली आहे. तसेच लवकरात लवकर पोलीस चोरांचा शोध घेतील. अशी देखील खात्री केलेली आहे.

अभिनेत्रीने सातारा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दाखल करताना तिने माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, “3 जून रोजी म्हणजे सोमवारी माझ्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. याबद्दल मी पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे. घरातून चोरांनी जवळपास दहा तोळे सोने आणि पैसे चोरलेले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आई घरात नव्हती त्यामुळे ती सुखरूप वाचली.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शर्मीन सहगलच्या समर्थनार्थ उतरली रिचा चड्ढा; म्हणाली, ‘इतका राग कशासाठी…’
‘प्रत्येकाने माझ्या नावाचा वापर केला…’, अनुषा दांडेकरने सोडले प्रियकर जेसन शाहच्या ब्रेकअपच्या दाव्यावर मौन

हे देखील वाचा