प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं आहे. हे दोघे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना कधीही मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियावर देखील ते सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसत असतात. अशातच आता या गोड जोडप्याच्या लग्नाला बुधवारी (६ ऑक्टोबर) १० वर्षे पूर्ण झाली आहे. एक शतक पूर्ण केल्याच्या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत पती उमेशला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात दोघेही वधू-वराच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांसाठी उखाणा घेताना दिसत आहेत. यात उमेश म्हणतो की, “कांती इतकी सुरेख रूप तिचं अलवार, प्रिया माझी रत्नजडित तलवार.” यावर प्रियासहित सगळे जोरजोरात हसू लागतात. प्रिया उखाणा घेत म्हणते, “सा रे ग म प च्या सुरांचा ल्यायला नवा साज, उमेश माझा जुना गडी नवं माझं राज.” (10th wedding anniversary priya bapat and umesh kamat shared special video)
सोबतच उमेशनेही त्यांच्या आठवणींना उजाळा देत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांच्या या पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहते आणि इतर कलाकार मंडळी त्यांना शुभेच्छा देत आहेत.
प्रिया आणि उमेशची ऑफस्क्रीन जोडी जितकी पसंती केली जाते, तितकंच ऑनस्क्रीनही त्यांना प्रेम मिळतं. या जोडीने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये ‘आणि काय हवं’, ‘टाइम प्लिज’, ‘शुभंमकरोती’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ यांचा समावेश आहे. तर अलीकडेच त्यांच्या ‘आणि काय हवं’ वेब सिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो
-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो