Saturday, June 29, 2024

12Th Fail फेम विक्रांत मेस्सीने विकी कौशलचे केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाला…

विकी कौशल (Vicky kaushal) बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही रॉकस्टार मानला जातो. अनेकवेळा विकीचे कौतुक होताना आपण पाहिले आहे. आता 12Th Fail फेम विक्रांत मेस्सीने विकी कौशलचे तोंडभरुन कौतुक केले आहे. विकी हा एक अद्भुत व्यक्ती असल्याचे विक्रांत मैस्सीने म्हटले आहे.

एका मुलाखतीत विक्रांत मेस्सीने मित्र विकी कौशलसंदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. “विकी माझा खूप चांगला मित्र आहे, चांगले चित्रपट करतो, खूप छान माणूस आहे. त्याने आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने खूप संघर्ष केला आहे. त्यांच्याकडे जे काही आहे त्यावर फक्त विकीचा हक्क आहे. तसेच तो एक अद्भुत व्यक्ती आहे. मला तो खूप आवडतो आणि मला वाटते की, तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.” अशा शब्दात विक्रांतने विकीचे कौतुक केले.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच संजय लीला भन्साळी यांनी विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘लव्ह अँड वॉर’ व्यतिरिक्त विक्की कौशलने नुकतेच ‘छावा’ या पीरियड ड्रामाचे शूटिंग पूर्ण केले आहे. छावामध्ये रश्मिका मंदान्ना विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विकी कौशल शेवटचा मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात दिसला होता. सॅम बहादूरसाठी विकीला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

तर विक्रांतच्या वर्कफ्रंटबद्दल, ‘घुम मचाओ धुम’ या 2008 साली आलेल्या मालिकेतून तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यानंतर ‘कबूल हैं’ या मालिकेतूनही तो झळकला होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतही त्यानं भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘मिर्झापूर’ या वेबसिरिजमुळे तो घराघरात पोहचला. सोबतच त्यानं अनेक वेबसिरिजमधून कामं केली होती. ‘गॅसलाईट’, ‘छपाक’, ‘जिनी वेड्स सनी’, ‘फॉरेन्सिक’, ‘हसिन दिलरुबा’, 12th Fail हे काही त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आमिर खानला नव्हती सुहानीच्या तब्येतीची माहिती, अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा
लग्नाच्या 3 वर्षानंतर वरून धवन होणार बाप, सोशल मीडियावर केली घोषणा

हे देखील वाचा