Wednesday, June 26, 2024

बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ

हे बॉलिवूड आहे भाऊ! इथे काहीही होऊ शकत! बोलीवूडकरांचा नादच करायचा नाही… आता हेच बघा ना एखाद्या साधारण मनुष्याने विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्याच्यावर नानाप्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात. मात्र बॉलिवूड मध्ये तसं नसतं बरं का! इथे आधीच लग्न झालेल्या पुरुषासोबत नवा संसार थाटता येतो. अहो खरंच आपल्याला विश्वास बसत नसेल तर मग अशा नायिकांवर आपण एक नजर मारुयात ज्यांनी आधीच विवाहित असलेल्या नायकांबरोबर स्वतःचा संसार थाटला.

१. हेमा मालिनी
एकेकाळची फार मोठी नायिका! अनेक सुपेरस्टार्स सोबत हिने सुपरहिट सिनेमे बॉलीवूडला दिलेले आहेत. बॉलिवूडची ही ड्रीम गर्ल धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडली. आणि तितकेच आकंठ प्रेमात धर्मेंद्र देखील बुडाले होते. जेव्हा की पंजाब मध्ये धर्मेंद्र यांचा आधीच एक विवाह झाला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं प्रकाश कौर. धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी दुसऱ्या लग्नाची परवानगी मिळावी म्हणून चक्क इस्लाम धर्म स्वीकारला. आणि शेवटी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. हे लग्न झाल्यानंतर मात्र दोघेही सुखाने संसार करत आहेत.

२. रविना टंडन
रविना टंडन यांना चित्रपट वितरक अनिल ठडानी यांच्यासोबत प्रेम झालं होतं. जेव्हा की अनिल हे पूर्वीपासूनच विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नताशा सिप्पी होतं. नताशा आणि अनिल याना दोन मुलं आहेत परंतु त्यांचा विवाह इतका यशस्वी नाही झाला. आणि म्हणून अनिल यांनी नताशा याना घटस्फोट दिला. यानंतर त्यांनी त्यांचं प्रेम असलेल्या रविना टंडन यांच्याशी २००३ मध्ये लग्न केलं.

३. श्रीदेवी
दक्षिण भारतात यश प्राप्त केल्यानंतर बॉलिवूडमध्ये नाव आणि कीर्ती प्राप्त करणारी अभिनेत्री श्री देवी इंडस्ट्रीतील नावाजलेले बोनी कपूर यांच्यावर प्रेम करून बसली. बोनी कपूरही तिच्यावर तितकंच प्रेम करू लागले. जेव्ह की बोनी कपूर त्यावेळी विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर होतं. बोनी आणि मोना याना एक मुलगा होता अर्जुन कपूर. तरीही बोनी यांनी १९९६ मध्ये श्री देवी यांच्याशी विवाह केला आणि यादोघांना दोन मुली झाल्या. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर.

४. करिश्मा कपूर
अभिषेक बच्चनसोबत ब्रेक अप झाल्यानंतर करिश्मा कपूर हिने झनजय कपूर सोबत लग्न केलं. संजय कपूर त्यावेळी विवाहित होता आणि त्याच्या पत्नीचं नाव नंदिता मेहतानी होतं. करिश्मा आणि संजय यांनी २००३ मध्ये लग्न केलं परंतू संजयचं हे लग्न सुद्धा यशस्वी ठरलं नाही. २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोट घेतला. संजय आणि करिश्माला समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत.

५. शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी ही २००९ साली व्यावसायिक राज कुंद्रा यांच्यासोबत विवाहबद्ध झाली.शिल्पा अगोदर सुद्धा राजचं एक लग्न झालं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता हे होतं. राज ने कविताला घटस्फोट दिला आणि शिल्पा सोबत लग्न केलं. राज आणि शिल्पा याना वियान हा मुलगा आहे.

६. राणी मुखर्जी
राणी मुखर्जी हिने देखील विवाहित पुरुषाशीच लग्न केलं आहे. राणी ही आदित्य चोप्राची दुसरी बायको आहे. राणी अगोदर आदीत्यचं पायल खन्ना हिच्या सोबत लग्न झालं होतं. राणी आणि आदित्य याना एक गोंडस लेक आहे जीचं नाव दोघांनी मिळून आदिरा ठेवलं आहे.

७. शबाना आझमी
शबाना आझमी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी जावेद अख्तर हे विवाहित होते. जावेद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इराणी होतं. यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं आणि आता दोघेही एकत्र आनंदी आयुष्य जगत आहेत.

हे देखील वाचा