Saturday, April 18, 2026
Home साऊथ सिनेमा धुरंदर 2च्या बॉक्स ऑफिस टक्करची भीती? टॉक्सिसच्या मेकर्सनी रिलीज डेट महिन्याभर ढकली पुढे

धुरंदर 2च्या बॉक्स ऑफिस टक्करची भीती? टॉक्सिसच्या मेकर्सनी रिलीज डेट महिन्याभर ढकली पुढे

कन्नड सुपरस्टार यश हा अनेक दिवसांपासून तो चर्चेत आहे, कारण त्याचा टॉक्सिक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, मात्र हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. जो बॉक्स ऑफिसवर धुरंधर 2 शी टक्कर देणार होता. मात्र हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार नाही. कारण निर्मात्यांनी त्याचे प्रदर्शन सुमारे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

टॉक्सिक (Toxic)आता 4 जून 2026 रोजी प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी बुधवारी एका पोस्टमध्ये याची घोषणा केली. घोषणा पोस्ट शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, “टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स हा एक चित्रपट आहे ज्याची आम्ही जागतिक प्रेक्षकांसाठी सिनेमा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून कल्पना केली होती. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, 19 मार्च रोजी तुमचा चित्रपट तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यास आम्हाला उत्सुकता होती. मात्र सध्याच्या अनिश्चिततेमुळे, विशेषतः मध्य पूर्वेतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांच्याशी जोडण्याच्या आमच्या ध्येयावर परिणाम करते.’, ‘म्हणून, आमच्या भागीदारांच्या आणि प्रेक्षकांच्या हितासाठी, आम्ही रिलीजची तारीख पुन्हा शेड्यूल करण्याचा कठीण परंतु विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. तुमच्या समजुती आणि संयमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.

तर आता या चित्रपटाचे सर्वात चर्चेचे कारण म्हणजे 19 मार्च रोजी ‘टॉक्सिक’ सोबत ‘धुरंधर 2’ प्रदर्शित होत आहे. धुरंधर आता बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक बनला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीच, शिवाय पायरसीमध्येही अगणित विक्रम प्रस्थापित केले. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट या महिन्यात 19 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. ‘टॉक्सिक’च्या निर्मात्यांनी आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आहे आणि आता हा चित्रपट 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

ग्लॅमरच्या शिखरावर असताना सोडली होती इंडस्ट्री, आज ही अभिनेत्री काय करते, घ्या जाणून

हे देखील वाचा