अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटातील त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाला. दरम्यान, अभिनेत्याने मुंबईतील त्याचा फ्लॅट विकला आहे. सुमारे १,३१८ चौरस फूट जागेत बांधलेला हा आलिशान फ्लॅट कोट्यवधी रुपयांना विकला गेला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार सलमान खानने हा फ्लॅट सुमारे ५.३५ कोटी रुपयांना विकला आहे. स्क्वेअर यार्ड्सनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथे असलेले त्याचे १,३१८ चौरस फूट अपार्टमेंट ५.३५ कोटी रुपयांना विकले आहे.
रिअल इस्टेट कन्सल्टंट स्क्वेअर यार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी सलमान खानच्या कराराच्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांची तपासणी केली आहे. या महिन्यात हा व्यवहार नोंदणीकृत झाला. सलमान खानचे हे अपार्टमेंट शिवस्थान हाइट्समध्ये आहे.
अभिनेता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. अभिनेत्याचा हा अपार्टमेंट वांद्रे येथे आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त आणि ईदनिमित्त अनेकदा चाहते येथे जमतात. सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीतून चाहत्यांना भेटतो. सलमान खानचा हा फ्लॅट १ बीएचके आहे. सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवर राहतो, तर त्याचे पालक पहिल्या मजल्यावर राहतात.
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंग देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पुण्यात घेतले अभिनयाचे शिक्षण; जाणून घ्या झरीना वहाब यांचा करिअर प्रवास
टुमारोलँड महोत्सवापूर्वी मोठी दुर्घटना; मुख्य स्टेजला मोठी आग, व्हिडिओ व्हायरल










