Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

बॉलिवूडमध्ये ‘नवाब साहब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सैफ अली खानचा एक व्हिडिओ शुक्रवारी म्हणजेच (दि. 3 मार्च)राेजी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो पॅपराझींना त्याच्या बेडरूममध्ये येण्यास सांगत होता. ही घटना रात्री उशिरा घडली, जेव्हा सैफ त्याची पत्नी करीना कपूर खानसोबत होता. यावेळी पॅपराझी त्याचे फोटो काढत होते आणि त्याच्या प्राइवेट प्रॉपटीच्या अवती-भाेवती फिरत हाेते. तेव्हा अभिनेता संतापला आणि म्हणाला, ‘एक काम करा, आमच्या बेडरूममध्ये या.’ अशात आता अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आणि विचारले की, ‘सीमारेषा कुठ पर्यंत आहे?’

अलीकडेच आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा एक फोटो व्हायरल झाला होता, जो दुसऱ्या इमारतीतील एका फोटोग्राफरने गुपचूप काढला होता, ज्यामुळे आलिया तिच्या इंस्टाग्राद्वारे पॅपराझींवर चांगलीच संतापली हाेती. याप्रकरणी अनेक सेलिब्रिटी तिच्या समर्थनार्थ समोर देखील आले हाेते. अशात आता जवळपास 20 फोटोग्राफर्स सैफ (saif ali khan) आणि करीनाच्या मागे त्यांच्या प्राइवेट प्राॅपर्टीमध्ये शिरले, ज्यावर अभिनेत्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेता म्हणाला, “आम्ही पॅपराझींना नेहमीच सहकार्य करतो तसेच त्यांना समजून देखील घेतो. मात्र, मी त्यांना तशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली. कराण, पॅपराझींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. घराबाहेर ठीक आहे. मात्र, अशा प्रकारे घरात प्रवेश करणे अत्यंत चुकीचे आहे. म्हणूनच मी ‘बेडरूम’वर कमेंट केली. कारण, त्यांनी ती मर्यादा ओलांडली.

सैफ इथेच थांबला नाही, तर ताे संताप व्यक्त करत पुढे म्हणाला, ‘हे पूर्णपणे हास्यास्पद होण्याआधी आणखी किती लिमीट क्रास कराव्या लागतील’. लेक तैमूर आणि जेह यांचे फोटो काढण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ताे म्हणाला, “मुले जेव्हा क्लासेसला जातात तेव्हा फाेटाे काढायची गरज काय? शाळेत त्यांना परवानगी नाही. कुठेतरी एक सीमारेषा आखून दिलेली आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणत आहोत. बाकीचे उगाचच यावर चर्चा करत आहेत. त्यांना माहितीदेखील नाही नेमकं काय घडलं आहे? मात्र, ते सत्य आम्हाला ठाऊक आहे. धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया सैफ अली खानने दिली.(20 photographers entered in bollywood actor saif ali khan and kareena khan private property actor got angry says where is limit line)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ सुपरस्टार आजही करतात शेती, कलाकार म्हणतो की, ‘शेण उचलल्याशिवाय दिवस सुरू होत नाही….,’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा