Saturday, June 29, 2024

‘आशिकी’ फेम राहुल रॉयला ब्रेन स्‍ट्रोक! आयसीयूमध्ये केलंय दाखल, चाहत्यांकडून देवाकडे प्रार्थना

‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉयला कारगिल येथे एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा सामना करावा लागला. त्याला मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल कारगिलमध्ये आपल्या ‘एलएसी- लाईव्ह द बॅटल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.

कारगिलमध्ये गोठवणारी थंडी आहे. त्यामुळे राहुलला ब्रेन स्ट्रोक झाला. त्याचा भाऊ रोमर सेनने याची पुष्टी केली आहे. तो म्हणाला की, राहुल आता ठीक होत आहे.

राहुल रॉयला प्रोग्रेसिव ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल केले गेले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. राहुल डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याला अचानक झालेल्या या त्रासामुळे सर्वच जण आणि त्याचे चाहते आश्चर्यकारक आहे. सर्वजण त्याच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना करत आहेत.

५२ वर्षीय राहुलच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. राहुलला पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. तत्पूर्वी राहुलची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. सुदैवाने त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सन १९९० साली प्रदर्शित झालेला ‘आशिकी’ या म्युझिकल ब्लॉकबस्टर चित्रपटातून राहुल यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘आशिकी’ या सिनेमामुळे राहुलला रातोरात प्रसिद्धीचे शिखर प्राप्त झाले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या सिनेमाने राहुलचे नशीब क्षणात बदलले.

त्यानंतर राहुलला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मात्र, ‘आशिकी’ सारखे यश त्यांना पुन्हा मिळू शकले नाही. हळू हळू राहुल सिनेसृष्टीतून गायब झाला. काही वर्षांपूर्वी बिग बॉस सिझन १ चे विजेतेपद पटकावल्यानंतर राहुल पुन्हा प्रकाशझोतात आला. पण याचा देखील त्याच्या कारकिर्दीला फायदा झाला नाही.

राहुलने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘जानम (१९९२)’, ‘जुनून (१९९२)’ या चित्रपटांचाही समावेश आहे.

वाचा-

मुंबई महापौरांच्या विधानावर का संतापली कंगना?

हे देखील वाचा