२०२० हे वर्ष अनेक कारणांनी लक्षात राहणारे ठरले. गेल्या वर्षी काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक वाईट गोष्टी घडल्या. ज्या कलाकार जोडयांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले होते अशा अनेक जोड्या गेल्या वर्षी वेगळ्या झाल्या. बऱ्याच कलाकारांना गेल्या वर्षी ब्रेकअपचे दुःख सहन करावे लागले. या यादीत काही नावं बॉलिवूडची तर काही टीव्ही क्षेत्रातील आहेत. नजर टाकूया अशाच काही कलाकारांच्या जोड्यांवर.
आशा नेगी आणि ऋत्विक धनजानी
टीव्ही क्षेत्रातील हॉट आणि लोकप्रिय कपल म्हणून आशा आणि ऋत्विक ओळखले जात होते. २०२० च्या एप्रिल महिन्यात या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. दोघंही सहा वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
या दोघांनी नच बलिए या डान्स शो च्या ६ व्या पर्वात भाग घेत या पर्वाचे ते विजेते होते. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती.
पूजा गौर आणि राज सिंग अरोरा
नुकतेच पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या आणि राजच्या ब्रेकअप बद्दल सांगितले. तब्बल १० वर्ष ही दोघे एकमेकांच्या प्रेमात होती. मात्र काही गोष्टींमुळे त्यांनी ब्रेकअप केल्याचे पूजाने स्पष्ट केले. पूजाने स्टार प्लसच्या सुपरहिट ‘प्रतिज्ञा’ मालिकेत काम केले होते तर राजने अक्षय कुमार सोबत ‘गब्बर इज बॅक’ मध्ये काम केले होते.
कृष्णा श्रॉफ आणि एबन हायम्स
जॅकी श्रॉफ ची मुलगी कृष्णा श्रॉफ हिने मागच्याच महिन्यात ती आणि एबन वेगळे झाल्याचे घोषित केले. कृष्णा आणि एबन हायम्स एकमेकांना वर्षभरापासून डेट करत होते. फक्त वर्षभरातच ह्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सिनेसृष्टीपासून लांब असूनही कृष्णा सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते.
करन कुंद्रा आणि अनुषा दांडेकर
एमटीव्ही व्हिजे अनुषा दांडेकर आणि टीव्ही कलाकार करण कुंद्रा यांचेही यावर्षी ब्रेकअप झाले असले तरी या दोघांकडूनही अजून यावर कोणतीच अधिकृत माहिती जाहीर झाली नाहीये. मागच्या अनेक वर्षांपासून ही दोघे एकत्र होती आणि लिव्ह इन मध्ये राहत होती.
सना खान आणि मेलविन लूईस
अभिनेत्री सना खान आणि नृत्यदिग्दर्शक मेलविन लुईस यांनीही याचवर्षी ब्रेकअप केले. सनाने मेलविनवर अनेक गंभीर आरोप करत ब्रेकअप केले. नुकतेच सनाने गुजरातच्या मुफ्ती अनस सईद यांच्यासोबत निकाह केला आहे.










