बॉलिवूडमध्ये पूर्वी कथेला अनुसरून सिनेमे येत होते. पण हळू हळू बॉलिवूडचा हा ट्रेंड बदलू लागला. पैसे कमावण्याच्या नादात बरेचसे निर्माते हे कथाहीन चित्रपट बनवू लागले. ज्यात मोठ्या अभिनेत्यांना घेतलं की सिनेमा चालेल, असा त्यांचा विश्वास होता. सुरुवातीचा काही काळ हा ट्रेंड सुद्धा बॉलिवूडमध्ये चालला. मग बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बोल्ड सिन येऊ लागले. प्रेक्षक आकर्षित देखील होऊ लागला आणि सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाई देखील करू लागले. परंतु हा देखील ट्रेंड जास्त काळ काही चालला नाही.
आजचा प्रेक्षकवर्ग हा सुजाण आहे. आजचा प्रेक्षक हा उत्तम कथेचा भुकेला आहे हे सुदैवाने बॉलिवूडच्या काही निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना समजलं आहे. त्यामुळे थोडे फार सिनेमे तरी त्या धाटणीचे येत आहेत. मग या चित्रपटात कथेच्या गरजेनुसार बोल्ड सिन असेल, तर मग काही हरकत नाही. परंतु जर जबरदस्तीने तो सिन चित्रपटात घुसवला गेला असेल, तर प्रेक्षक आज सोशल मीडियातर्फे दिग्दर्शकाला त्याची चूक दाखवून देतो. बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत, जे आजही आपण संपूर्ण कुटुंबासहित बसून पाहू शकत नाही. कोणते आहेत असे सिनेमे, त्यांच्यावर एक नजर टाकूयात.
कामसूत्र – अ टेल ऑफ लव्ह
सन १९९६ साली आलेल्या कामसूत्र- अ टेल ऑफ लव्ह या चित्रपटाला भारतात फार विरोध सहन करावा लागला. या चित्रपटाची कथा ही वात्सयन यांनी लिहिलेल्या कामसूत्र या पुस्तकातील ज्ञानाभोवती लिहिली गेली आहे. एका कथेमार्फत हे ज्ञान दिग्दर्शिका मीरा नायर यांनी या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड तसेच न्यूड सीन्स चित्रित केले गेले होते आणि ते चित्रपटात दाखवलेही गेले होते. या चित्रपटात इंदिरा वर्मा, रेखा, सरिता चौधरी, नवीन अँड्र्यूज या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट आपण कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच.
मर्डर
सन २००४ मध्ये रिलीज झालेल्या मर्डर या चित्रपटाने त्यावेळी खळबळ उडाली होती. ‘भिगे होठ तेरे’ या गाण्यात या चित्रपटाचे खूपच बोल्ड सीन होते. लग्नानंतरही प्रियकरासोबत शारीरिक संबंध बनवण्याच्या तिच्या नात्याची कहाणी प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटांमध्ये मल्लिका शेरावत, इम्रान हाश्मी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या असून या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं होतं. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्याची चूक कधीही करु नका.
ज्यूली
मर्डर चित्रपटानंतर २००४ मध्ये आलेला ज्युलीमध्ये देखील बोल्ड सीन्सचा अक्षरशः भडीमार केला होता. एक सामान्य मुलीचा प्रत्येक पायरीवर फक्त सेक्ससाठी वापर करून घेतला जातो आणि तिला अलगद बाजूला सारलं जातं. या सगळ्याचा ती भावनाहीन मुलगी कशी सामना करते हेच या चित्रपटात दाखवलं गेलं आहे. या चित्रपटात, नेहा धुपिया,
यांशु चॅटर्जी, संजय कपूर, यश टोंक यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत, तर या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक शिवदासानी यांनी केलं आहे.
जिस्म २
‘जिस्म २’ या चित्रपटाद्वारे सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या चित्रपटामध्ये बोल्ड सिन देऊन तिने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवली. या चित्रपटात रणदीप हूडाने त्याच्या उत्तम अभिनयाची झलक दाखवली होती. बोल्डनेसच्या बाबतीत सांगायचे झाले, तर हा चित्रपट या यादीमध्ये खूपच जास्त वर आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री पूजा भट हिने केलं होतं.
बीए पास
हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. बीए पास लोकांना खूपच आवडला. चित्रपटाची कथा उत्कृष्ट होतीच, शिवाय त्यात असे बोल्ड सीन्स होते जे प्रेक्षकांनी यापूर्वी कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात पाहिले नव्हते. या चित्रपटात शिल्पा शुक्ला, शादाब कमल, राजेश शर्मा, दिबेंदु भट्टाचार्य या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत, तर या सिनेमाचं दिग्दर्शन अजय बहल याने केलं आहे.