चित्रपटांमधले अनेक खलनायक खुप हिट झाले आहेत. पण काही खलनायक मात्र आजही अजरामर आहेत. असाच एक खलनायक मराठीमध्ये देखील झाला आहे.
१९९० साली मराठीमध्ये ‘धडाकेबाज’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. पण या चित्रपटासोबतच या चित्रपटातील खलनायक देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला.
महेश कोठारे ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ह्या चित्रपटांत लक्ष्मीकांत बेर्डे असेल ह्यांनी डबल रोल केला होता. ज्यात लक्ष्याला एक बाटली सापडते आणि त्या बाटलीत छोटा गंगाराम अडकलेला असतो.
जो अगदी लक्ष्या सारखा दिसतो. त्या बाटलीत जोपर्यंत वाळू असते तोपर्यंत तो लक्ष्याची मदत करतो. जेव्हा जेव्हा लक्ष्या संकटात सापडतो तेव्हा तेव्हा हा गंगाराम त्याला त्या परिस्थितीतून सोडवतो. परंतु जेव्हा ती वाळू संपेल तेव्हा तो निघून जाईल.
या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिपक शिक्रे यांच्या मुख्ये भुमिका होत्या. पण चित्रपटतील सर्वात जास्त गाजला तो म्हणजे खलनायक.
‘कवट्या महाकाल’ असे त्या खलनायकाचे नाव होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा कवट्या महाकाळ नेमका कोण होता. असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण याचे उत्तर काही भेटत नव्हते.
३० वर्षे झाली तरी या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. मग ह्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की सुरुवातीला कवट्या महाकालची भूमिका ‘बिपीन वारती’ या कलाकाराने साकारली होती.
बिपीन वारती अभिनेते आहेतच. परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांनी ‘एक गाडी बाकी अनाडी , ‘चंगू मंगू’ आणि‘डॉक्टर डॉक्टर’ ह्यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
अगोदरच्या बिपीन वारती कवट्या महाकाळ ही भुमिका निभावणार होते. परंतु त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना ह्या चित्रपटासाठी वेळ देता आला नाही.
त्यांना पुढे या चित्रपटात काम करता आले नाही. त्यामूळे तब्बल आठ कलाकारांनी हि भूमिका साकारली होती. त्या आठ जणांनी कवट्या महाकाल हि भुमिका निभावली.
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनासुद्धा त्या आठ कलाकारांची नावे आठवत नाहीत. परंतु त्या कवट्या महाकाळचा आवाज हा बिपीन वारती ह्यांचाच आहे. असे महेश कोठारे ह्यांनी सांगितले.
हेही वाचा-
– बाबा चमत्कार काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा
– अशी ही बनवा बनवी चित्रपटातील शंतनू लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा
–लक्ष्याला आठवताना : पाहूयात लक्ष्मीकांत बेर्डेंचे काही गाजलेले चित्रपट, हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल