Monday, July 8, 2024

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या ‘पिरितीया के बानी पियासल’ गाण्याची कमाल; मिळाले ३० लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज

आपल्या बोल्ड अंदाजाने लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणारी भोजपुरी अभिनेत्री ‘मोनालिसा’ हिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याने ती नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या हॉट लूक्स‌ मधील फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे अनेक गाणे यूट्यूबवर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. तिचा चाहता वर्ग तेवढा मोठा असल्यामुळे तिच्या फोटोला पसंती देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळते. तिचे नुकतेच प्रदर्शित झालेले, ‘पिरितिया के बानी पियासल’ हे गाणे देखील भन्नाट व्हायरल झाले आहे.

भोजपुरी चित्रपटापासून ते बिग बॉस पर्यंतचा मोनालिसाचा प्रवास तिला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. तिने यातून तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या गाण्यात मोनालिसा ही बोल्ड अंदाजात डान्स करताना दिसत आहे.

या प्रसिद्ध गाण्याला टीम फिल्म भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण यावरून लावू शकतो की, या गाण्याला यूट्यूबवर 30 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहे.

मोनालिसा हिने अनेक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉस सीझन 10 मध्ये देखील प्रेक्षकांच्या निदर्शनास आली. मोनालिसा हिने ‘नजर’चा पहिला सीझन पूर्ण केला आहे तसेच ती ‘नजर 2’ मध्ये देखील प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या शोमध्ये तीने एका ‘डायन’ चं पात्र निभावलं आहे. याव्यतिरिक्त तिला भोजपुरी सिनेमांमध्ये देखील प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि प्रसिध्दी मिळाली आहे.

हेही वाचा-

‘मच्छरिया’ गाण्याची सोशल मीडियावर धमाल; ६ दिवसांत मिळाले ५० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, रिलीझ होताच मिळवलं प्रेक्षकांच्या मनात स्थान

तीन सुपरस्टारने एकत्र येत दिलंय सुप्पर डुप्पर हिट गाणं, बोल आहेत ‘धीरे धीरे बढी नजदिकिया, धीरे धीरे फ्रेन्ड गर्लफ्रेंड हो गयी’

हे देखील वाचा