Sunday, March 23, 2025
Home भोजपूरी तीन सुपरस्टारने एकत्र येत दिलंय सुप्पर डुप्पर हिट गाणं, बोल आहेत ‘धीरे धीरे बढी नजदिकिया, धीरे धीरे फ्रेन्ड गर्लफ्रेंड हो गयी’

तीन सुपरस्टारने एकत्र येत दिलंय सुप्पर डुप्पर हिट गाणं, बोल आहेत ‘धीरे धीरे बढी नजदिकिया, धीरे धीरे फ्रेन्ड गर्लफ्रेंड हो गयी’

हरियाणवी संगीताचे नामांकित गायक ‘अरविंद जांगीड’ हे जी काही गाणी घेऊन येतात ती यूट्यूब वर खूप कमाल करतात. आताही अरविंद जांगिड हे पुन्हा एक नविन गाणे घेऊन धमाल करायला आले आहे.

अरविंद जांगीड यांचा नवीन गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला असून तो जबरदस्त व्हायरल होत आहे. या गाण्याला केवळ ७ दिवसांत ५६ लाख हिट्स मिळाल्या आहेत. यावरुन तुम्ही सहज अंदाज घेऊ शकता की अरविंद जांगीड यांची लोकप्रियता कशी असेल.

या गाण्याचे बोल आहेत , ‘धीरे धीरे बढी नजदिकिया, धीरे धीरे फ्रेन्ड गर्लफ्रेंड हो गयी’. या गाण्याला संगीत सुद्धा गायक अरविंद जांगीड यांनीच दिले आहे आणि ‘अजय हुड्डा’ यानी गाण्याचे बोल लिहले आहे. हे गाणे ‘अंजली राघव ‘आणि ‘अजय हुड्डा’ याच्यावर चित्रित केले गेले आहे.

या गाण्यामध्ये अजय हुड्डा आणि अंजली राघव यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. 2020 च्या शेवटच्या दिवशी रिलीज झालेलं हे गाणं ‘ गापामा’ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे.

अजय हुड्डा आणि अरविंद जांगीड ही हरियाणवी संगीत क्षेत्रात गाजलेली नावे आहेत. या जोडीची गाणी रिलीज होताच खूप वेगाने व्हायरल होतात. यांच्या व्हिडिओजला चांगली पसंती मिळते. आताही या रोमँटिक गाण्यामध्ये त्याच्या कामाला खूप पसंती मिळते आहे. हेच कारण आहे की रिलीज होताच हे गाणे खूप वेगाने व्हायरल होत आहे. तसं पाहिलं तर आजकाल हरियाणवी गाण्यांना संपुर्ण देशात पसंती मिळत आहे. सपना चौधरी, रेणुका पंवार, अरविंद जांगीड असे काही हरियाणवीचे कलाकार आहेत,ज्यांनी संपूर्ण देशात आपले फॅन्स बनवले आहेत.

हे देखील वाचा