Tuesday, July 9, 2024

ओळखलं का मंडळी! पाहा तुमचे आवडते बालकलाकार आता दिसतात तरी कसे

बॉलीवूड मध्ये अनेक बालकलाकार अभिनय करतात. अनेक बालकलाकारांनी तर त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेक मोठ्या चित्रपटांना हिट केले आहेत.

असेच काही बालकलाकार मोठे झाल्यावर अभिनय क्षेत्रातच काम करतात तर काही दुसऱ्या क्षेत्रात जातात. ऋषी कपूर पासून ते उर्मिला मातोंडकर पर्यंत आणि आदित्य नारायण पासून हंसिका मोटवानी पर्यंत अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे.

आजच्या या लेखात आपण अशाच काही बालकलाकारांना बघणार आहोत ज्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहेत आणि जे आता काय काम करतात.

जिबरान खान :

‘कभी ख़ुशी कभी गम’ या सिनेमात शाहरुख आणि काजोलच्या मुलाची ऋषीची भूमिका साकारणारा क्यूट मुलगा म्हणजे जिबरान खान. जिबरान आता २७ वर्षाचा झाला आहे. कभी ख़ुशी कभी गम चित्रपटात जिबरानने अतिशय सुंदर भूमिका साकारली होती. आता जिबरान अतिशय हँडसम झाला असून लवकरच तो रणबीर आणि आलिया यांच्या चित्रपटात दिसणार आहे. आतापासूनच जिबरानचे सोशल मीडियावर दीडलाखापेक्षा जास्त फॅन फॉलोविंग आहे.

अभिषेक शर्मा :

ऋतिक रोशन आणि आमिषा पटेल यांच्या ब्लॉकबस्टर ‘कहो ना प्यार हैं’ सिनेमात ऋतिक रोशनच्या लहान भावाची म्हणजे अमित मेहराची भूमिका अभिषेकने साकारली होती. आता अभिषेक ३३ वर्षाचा झाला आहे. तो सध्या टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यरत आहे. अभिषेकने आतापर्यंत बेस्ट ऑफ लक निक्की, सुरवीन गुग्गल आणि निमकी मुखिया या मालिकांमध्ये झळकला आहे.

https://www.facebook.com/abhisheksharmaofficial/photos/496962640329126

साक्षी सेम :

२००० साली प्रदर्शित झालेल्या अजय देवगण, काजोल आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘राजू चाचा’ सिनेमात दिसलेली लहान गोड मुलगी म्हणजे साक्षी. साक्षी आता एक ग्लॅमरस अभिनेत्री झाली असून, आता देखील चित्रपटसृष्टीत काम करते. तिने २०१५ अली आलेल्या ‘रहस्य’ या सिनेमात तिने सहकालकाराची भूमिका साकारली होती.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1137382179624727&set=pb.100000588675133.-2207520000..&type=3

परजान दस्तूर :

कुछ कुछ होता हैं सिनेमात नेहमीच आकाशातल्या चांदण्या मोजणारा आणि नेहमीच एकही शब्द न बोलणाऱ्या क्युट मुलाची भूमिका परजानने अतिशय उत्तम केली. आता परजान २९ वर्षाचा झाला आहे. २०१७ साली आलेला पॉकेट मम्मी या सिनेमात परजानने काम केले होते. परजान अभिनयासोबत उत्तम लेखकही आहे.

पूजा रूपारेल :

हिंदी सिनेमात इतिहास रचणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटात काम करणारी चुटकी अर्थात पूजा.
पूजाने या सिनेमात काजोलच्या बहिणीची चुटकीची भूमिका केली होती. सोबतच पूजा किंग अंकल या चित्रपटात देखील झळकली. आज पूजा ४० वर्षाची असून ती आता स्टेंडअप कॉमेडियन आणि गायिका आहे. शिवाय पूजाने अनेक सिनेमात देखील काम केले आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10155701845398517&set=pb.718033516.-2207520000..&type=3

मालविका राज :

कभी ख़ुशी कभी गम सिनेमात काजोलच्या बहिणीची म्हणजेच करीना कपूरच्या लहानपणाची भूमिका साकारणारी सुंदर मुलगी म्हणजे मालविका राज. मालविका आता तेलगू चित्रपटसृष्टीत काम करते. २०१७ साली मालविकाची मुख्य भूमिका असणारा जयदेव हा सिनेमा आला.

झनक शुक्ला :

शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या ‘कल हो ना हो’ सिनेमात प्रीतीच्या सावत्र बहिणीची भूमिका करणारी गोड आणि क्युट मुलगी म्हणजे झनक शुक्ला. आज झनक २४ वर्षाची असून तिने टीव्हीवर करिश्मा का करिश्मा, हातिम, सोनपरी, गुमराह या मालिकांमध्ये काम केले आहे.

अथित नाईक :

‘कल हो ना हो’ या सिनेमात प्रीतीच्या भावाची भूमिका साकारणारा मुलगा म्हणजे अथित. अथितने आतापर्यंत ७ फिचर सिनेमे, १७६ टीव्ही कमर्शियल आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. फिलिपींस, लॉस एंजिलिस आणि सेनफ्रांसिसको सारख्या ठिकाणी अथितने काम केले असून सध्या तो भारतात डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी करत आहे.

एहसास चन्ना:

एहसासने आतापर्यंत कभी अलविदा ना केहना, वास्तुशास्त्र, माय फ्रेंड गणेश, फूंक, फूंक २ सारख्या चित्रपटांमध्ये आणि क्राइम पेट्रोल, सीआईडी, कोटा फैक्टरी, होस्टल डेज या मालिकांमध्ये काम केले आहे. आता सध्या एहसास टीव्ही क्षेत्रात कार्यरत आहे.

आयेशा कपूर :

अमिताभ बच्चन यांच्या २००५ च्या ब्लॅक हा सुपरहिट चित्रपटात झळकलेले मुलगी म्हणजे आयेशा. आयेशाने ब्लॅक या सिनेमात राणी मुखर्जीच्या लहानपणाची भूमिका निभावली होती.

आता आयेशा २६ वर्षाची असून ती आता शेखर कपूर यांच्या पाणी सिनेमाचा भाग असणार आहे.

वाचनीय लेख-

-पती सोबतचे नाते संपल्यावरही बॉलीवूड सारख्या मायाजाळात खंबीरपणे उभ्या राहिल्या या ५ अभिनेत्र्या

-सुपरस्टार अभिनेत्री ते शक्तिशाली महिला राजकारणी, अम्मा.! मृत्यूनंतर शेकडो चाहत्यांनी केल्या आत्महत्या

-बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ

हे देखील वाचा