Monday, June 17, 2024

Year Ending 2021: अनुष्का ते प्रिती, ‘या’ कलाकारांसाठी २०२१ वर्ष ठरले खास; चिमुकल्या पाहूण्यांचे केले स्वागत

सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत २०२१ हे वर्ष बरेच भीतीदायक होते. २०२१मध्ये कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आणि सर्व लोक लॉकडाऊनमध्ये अडकले. एकीकडे कोरोनामुळे सर्वच नागरिक आणि कलाकार त्रस्त असताना, काही सेलिब्रिटींच्या घरी चिमुकले पाहुणे आले. बरेच लोकप्रिय सेलिब्रिटी आई-बाबा बनले. अनुष्का शर्मापासून ते प्रिती झिंटापर्यंत आज आम्ही तुम्हाला यावर्षी आई- बाबा बनलेल्या सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसाठी २०२१ हे वर्ष खूप खास ठरले. या जोडप्याच्या घरी ११ जानेवारीला वामिकाने जन्म घेतला. हे दोघे नेहमी त्यांच्या मुलीसोबत दिसतात. त्या दोघांनी त्यांच्या मुलीसोबत सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्काने पत्रकारांचे तिच्या मुलीचे फोटो छापले नाहीत किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले नाहीत म्हणून आभार मानले होते.

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान यावर्षी दुसऱ्यांदा आई बनली. डिसेंबर २०१६ मध्ये ती पहिल्यांदा आई झाली होती. तिच्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर आहे. २१ फेब्रुवारी २०२१मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव जहांगीर ठेवले आहे. ज्याला सर्व प्रेमाने जेह बोलतात.

प्रिती झिंटा (Preity Zinta)
प्रिती झिंटानेही यावर्षी तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली. प्रिती झिंटाने नोव्हेंबर महिन्यात घोषणा केली की, ती २ जुडवा मुलांची आई झाली आहे. प्रिती जिंटा आणि जीन गुडईनफने सरोगेसीद्वारे मुलांना जन्म दिला आहे. प्रिती जिंटाने  मुलांचे नाव जय आणि जिया ठेवला आहे.

दिया मिर्झा (Dia Mirza)
चाळीस वर्षांची अभिनेत्री दिया मिर्झाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये बिझनेस मॅन वैभव रेखीसोबत लग्न केलं. १४ मेला तिने बाळाला जन्म दिला. तिचा मुलगा दोन महीने आईसीयूमध्ये होता. परंतु तो आता ठीक आहे. दियाने मुलाचे नाव अव्यान आजाद ठेवले आहे.

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal)
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि तिचा पती शिलादित्य मुखोपाध्याय हे दोघे यावर्षी आई बाबा झाले. २२ मेला श्रेया घोषालच्या घरी नवीन पाहुणा आला. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव देव्यान असे ठेवले आहे.

नीती मोहन (Neeti Mohan)
गायिका नीती मोहन देखील या वर्षी आई झाली. २०१९ मध्ये नीतीने निहार पांड्या याच्याशी लग्न केले होते. तर २ जूनला नीती आई झाली. तिने मुलाचे नाव आर्यवीर असे ठेवले आहे.

हर्षदीप कौर (Harshdeep Kaur)
गायिका हर्षदीप कौर आणि तिचा पती मनकित सिंग ३ मार्च २०२१ मध्ये आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव हूनर सिंग असे ठेवले आहे.

लीजा हेडन (Lisa Haydon)
लीजा हेडन हिने यावर्षी मार्च महिन्यामध्ये तिसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिने आणि तिच्या पती डिनो लालवाणीने त्यांच्या मुलाचे स्वागत केले. मुलीचे नाव लारा असे आहे.

अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurrana)
बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना आणि त्याची पत्नी आकृती आहुजा यांनी देखील २७ ऑगस्टमध्ये त्यांच्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी त्याचे नाव अर्जोइ ठेवले आहे. ते दोघं त्याला प्रेमाने जोई आणि जूजू बोलतात.

नेहा धुपिया (Neha Dhupia)
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी यावर्षी ३ ऑक्टोंबरला त्यांच्या बाळाचे स्वागत केले. या जोडप्याने २०१८ मध्ये लग्न केले होते. त्याच वर्षी नेहाने एका मुलीला देखील जन्म दिला. तिचे नाव मेहर आहे.

एवलिन शर्मा (Evelyn Sharma)

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील अभिनेत्री एवलिन शर्मा हिने तिच्या प्रियकरासोबत तुषार भिंडी १५ मे, २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे लग्न केले. त्यानी देखील १२ नोव्हेंबरला एका सुंदर बाळाला जन्म दिला.

हेही वाचा :

हे देखील वाचा