Year Ending 2021: मनोरंजन विश्वातील ‘या’ जोड्यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय


अवघ्या काही दिवसात आपण २०२१ ला बाय म्हणत २०२२ मध्ये प्रवेश करणार आहोत. २०२१ हे वर्ष पुन्हा एकदा कोरोनामुळे गाजले. मात्र यावर्षाचा उत्तरार्ध बॉलिवूडची तास चांगला होता. सिनेमे जरी कमी प्रदर्शित झाले असले तरी मोठमोठ्या चित्रपटांच्या घोषणा केल्या गेल्या. पूर्ण सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या. अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या छोट्या झलकी प्रेक्षकांना दाखवल्या गेल्या. तर अनेक सिनेमांचे ट्रेलर रिलीज करण्यात आले. या सर्वांमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठ्या आणि धक्कायदायक अशा कलाकारांनी त्यांच्या घटस्फोटाची माहिती देत सगळीकडे एकच गोंधळ उडवला. यावर्षी अनेक अनपेक्षित कलाकारांनी त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. यात बॉलिवूडसोबतच, साऊथ आणि इतरही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकारांची नावे सामील आहेत. चला तर मग जाऊन घेऊया यावर्षी कोणकोणत्या कलाकारांनी घटस्फोट घेत फॅन्स दिला मोठा धक्का.

आमिर खान आणि किरण राव :
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट खान म्हणून ओळख मिळवलेल्या आमिर खान (Aamir Khan) याने घटस्फोट जाहीर करताच इंडस्ट्रीसोबतच प्रेक्षकांमध्ये देखील एकच कल्ला झाला. यावर्षीची ही बातमी सर्वात मोठी ठरली. अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक अशा या बातमी त्याचा फॅन्ससोबतच मीडिया आणि इतर प्रेक्षकांना देखील हादरवले होते. या दोघांनी त्यांचे १५ वर्षे जुने नाते संपवत घटस्फोट घेतला. मात्र ते मुलांसाठी कायमच सोबत असतील आणि मिळून त्यांना मोठे करतील असेही त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले होते. आमिर खानचे हे तिसरे लग्न होते.

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य :
यावर्षीच्या घटस्फोटाच्या यादीत साऊथ इंडस्ट्रीमधील समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचा घटस्फोट देखील फॅन्ससाठी मोठा धक्का होता. समंथा आणि नागा या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडीने ऑक्टोबरमध्ये ते घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. ते वेगळे होण्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत होत्या, मात्र त्यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य येत नव्हते. अखेर ऑक्टोबरमध्ये या दोघांनी निवेदन जरी करत वेगळे होत असल्याचे सांगितले.

कीर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल :
अभिनेत्री कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आणि साहिल सहगल यांनी देखील यावर्षी घटस्फोट घेतला. कीर्तीने अनेक चित्रपटांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या कीर्तीने सांगितले होते की, ते दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत. हे सर्व त्यांच्यासाठी सोपे नव्हते, मात्र ते होणे आवश्यक असल्याचेही तिने सांगितले.

करण मेहरा आणि निशा रावल :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता असलेल्या करण मेहरा (Karan Mehra) याने देखील यावर्षी त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्याचे ठरवले आहे. करण मेहरा आणि निशा रावल हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्या दोघांनी लग्न केले होते, मात्र या वर्षी त्यांचे लग्न तुटले. निशाने करणवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आणि घरगुती हिंचाचाराचा आरोप केला होता. यात करणला अटक देखील करण्यात आली होती.

नुसरत जहाँ आणि निखिल जैन :
टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) हिने २०१९ मध्ये निखील जैनशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाने आणि घटस्फोटाच्या यावर्षी खूपच लक्ष वेधून घेतले. या दोघांचे लग्न खूप वादात सापडले होते, नुसरतने सांगितले की, त्या दोघांचे लग्न तुर्कीमध्ये झाल्याने भारतात ते नोंदणीकृत नव्हते, त्यामुळे त्यांचे लग्न भारतात वैध नाही.

इतकेच नाही तर नुसरतने निखिलसोबतचे तिचे नाते लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचे म्हटले होते. अनेक आरोपप्रत्यारोपांनंतर ते वेगळे झाले.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!