Friday, March 29, 2024

ह्रतिक रोशनचं वाढलं टेन्शन; सीआययुने ‘या’ प्रकरणात बजावलं समन्स

कंगना रणौतने हृतिक रोशनसोबतचे तिचे नाते जाहीर रित्या कबूल केले होते. एवढेच नव्हे तर ती रजत शर्माचा टीव्ही शो ‘आप की अदालत’ मध्ये केलेल्या वक्तव्यामधून ती हृतिकवर जोरदार हल्ला करताना दिसली होती. त्यांच्यातील वाद हा नेहमी चर्चेचा विषय बनत आलाय. आता पुन्हा एकदा या दोघांतील वादाने नवा रंग घेतला आहे.

मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) हृतिक रोशनला कंगना रनौत संबंधित ई-मेल प्रकरणाच्या संदर्भात समन्स बजावले आहे. त्याला शनिवारी सीआययूसमोर हजर राहावे लागेल आणि त्याचे निवेदन नोंदवावे लागेल. हृतिक आणि कंगना यांच्यातील या 5 वर्ष जुन्या प्रकरणाची चौकशी पूर्वी मुंबई पोलिसांचे सायबर सेल करत होते. परंतु, डिसेंबर 2020 मध्ये ती केस सीआययूकडे सोपविण्यात आली.

कंगना रणौत आणि हृतिक रोशनचे पूर्ण प्रकरण
सन 2016 मध्ये हृतिकने कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदविली होती. त्यानुसार 2013 ते 2014 पर्यंत त्याला कंगनाकडून 100 ईमेल आले होते. हे सर्व मेल कंगनाच्या आयडीवरून पाठविण्यात आले होते. तथापि, हृतिकच्या वतीने दाखल केलेला हा खटला अज्ञात व्यक्तीसाठी होता, जो IPC r/w 66 C आणि D च्या कलम 419 नुसार नोंदविला गेला होता. वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून, या प्रकरणाच्या चौकशीत कोणतीही कारवाई झालेली नाही असा सवाल केला होता. यानंतर हे प्रकरण सायबर सेलकडून सीआययूकडे सोपविण्यात आले.

सन 2016च्या या प्रकरणात कंगना आणि हृतिकने एकमेकांना नोटीस पाठविली होती. जेव्हा एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले तेव्हा त्याने ही नोटीस पाठविली होती. यानंतर असे वृत्त समोर आले की, रिलेशनशीपमध्ये असताना कंगनानेच हृतिकला हे मेल केले होते. कंगना आणि हृतिकने 2010 मध्ये ‘काईट्स’ आणि 2013 मध्ये ‘क्रिश-3’ केवळ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यादरम्यानच कंगना-हृतिकच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या.

कंगनाने एका मुलाखतीत सांगितले की, हृतिकसोबत झालेल्या वादानंतर जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावले होते. तसेच त्यांनी हृतिकची माफी मागण्यासाठी कंगनावर दबाव आणला होता. याव्यतिरिक्त अभिनेत्रीने करण जोहर, जावेद अख्तर आणि महेश भट्ट सारख्या बड्या व्यक्तिरेखांचे बॉलिवूडचे ‘सुसाईड गँग’ म्हणून वर्णन केले होते.

हे देखील वाचा