Saturday, June 29, 2024

भोजपुरी स्टार राकेश मिश्राने केला अक्षरा सिंगसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर, सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

भोजपुरी स्टार राकेश मिश्रा एका नंतर एक सुपरहिट गाणी देऊन सगळीकडे धमाल करत आहे. म्युझिक अल्बम सोबतच त्याच्या चित्रपटातील गाणी देखील खूपच व्हायरल होत आहेत. त्याच्या या गाण्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. पण आज तो त्याच्या गाण्यामुळे नाही, तर त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आहेत. त्याने अक्षरा सिंग हिच्या सोबतचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला खूपच लाईक्स आणि कमेंट मिळताना दिसत आहे. सोबतच हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

राकेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अक्षरासोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, ‘सर्वांना सुप्रभात!! प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कारण आयुष्यात गोष्टी पुन्हा पाहण्यासाठी रिवाईंड कंट्रोल नाही.’ या फोटोमध्ये अक्षराने लाल रंगाची साडी घातली आहे, तर राकेशने निळा शर्ट घातला आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो त्यांचा एका जुन्या गाण्यामधील आहे. राकेशने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये डॉक्टर श्वेता मिश्रा हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘दुश्मन सरहद पार के’, ‘स्पेशल इन्काऊंटर’, ‘राधे रांगीला’, ‘हरी ओम हरी’, ‘राणी की आयेगी बरात’ हे चित्रपट केले आहेत. यासोबत तो लवकरच रोमँटिक ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शुभी शर्मा दिसणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा निर्मात्यांनी अजून कोणताही खुलासा केला नाही.

अनेक सुपरहिट चित्रपटांबरोबरच राकेशने अनेक ब्लॉकबस्टर गाणी देखील केली आहेत. इंटरनेटवर सध्या त्याची गाणी खूपच व्हायरल होत आहेत. अक्षरा सिंगसोबत ‘तू ही लगावा’ हे गाणे हीट झाल्यानंतर त्याचे दुसरे गाणे ‘जदी हमरो भतार कोई होता’ हे गाणे रिलीज होऊन मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-आहा! ‘५२ गज का दामन’ गाण्यावर ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हे देखील वाचा