‘फँड्री’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली ‘शालू’ म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात. राजेश्वरी आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत येत असते. कधी हॉट फोटो, तर कधी साडीतील फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. तिने नुकतेच आपला साडीतील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून पसंती दर्शवली. आता याच साडीतील व्हिडिओ तिने शेअर केला आहे. जो चाहत्यांना भलताच आवडला आहे.
राजेश्वरीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले की, “जेव्हा तुम्ही डान्स करता, तेव्हा आयुष्य खूप चांगले होते.” तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
https://www.facebook.com/watch/?v=2963704397284724
या व्हिडिओमध्ये तिने ‘५२ गज का दामन’ या भोजपुरी गाण्यावर जोरदार डान्स स्टेप्स केल्या आहेत. गुलाबी आणि काळया रंगाची साडी घालून या डान्स स्टेप्स तिने केल्या आहेत. त्यामुळे ती सगळ्यांना आकर्षित करत आहे. अवघ्या काही तासातच तिच्या या व्हिडिओला हजारोमध्ये लाईक्स मिळत आहे.
तिचा डान्स पाहून कोणीही स्वतःला लाईक्स करण्यापासून थांबवू शकत नाही.
राजेश्वरीने ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटातील ‘शालू’ या पात्राने तिची सर्वत्र ओळख निर्माण केली. यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात देखील काम केले. ‘प्रदीप टोणगे’ आणि ‘मंगेश शेंडगे’ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुशांतच्या मृत्यूचा धक्का आजही पचवू शकली नाही अंकिता, मुलाखतीत सांगितल्या ‘या’ गोष्टी
-आमिर खाननंतर आता आर माधवनही झाला कोरोना पॉझिटिव्ह, अभिनेत्याने मजेशीर अंदाजात दिली माहिती
-धक्कादायक! रिक्षामध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, दीर्घ काळापासून होता आर्थिक अडचणीत