Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड नवरा असावा तर अस्सा! हाताला जखम झालेल्या जेनिलियाचे केस विंचरतोय रितेश

नवरा असावा तर अस्सा! हाताला जखम झालेल्या जेनिलियाचे केस विंचरतोय रितेश

वैवाहिक जीवन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूड कलाकार रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा. बॉलिवूडमधील हे लव्हबर्डस आपल्या प्रेमाच्या वेगवेगळ्या अंदाजाने सगळ्यांना त्यांच्या प्रेम कहाणीकडे आकर्षित करतात. जेनिलाया नेहमीच आपले रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो प्रेक्षकांमध्ये शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.

जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात जेनेलिया आरशासमोर एका खुर्चीवर बसलेली आहे. तिच्या हाताला आर्म सपोर्टर आहे. तिच्या हाताला काहीतरी जखम झालेली दिसत आहे. त्यामुळे रितेश तिचे केस विंचरत आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया एक्स्प्रेशन देताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने लिहले आहे की, “मला कोणीतरी असा हवाय जो माझ्या प्रत्येक प्रसंगात मला साथ देईल आणि नेहमी प्रेम करेल.” त्यांचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. रितेशचा केअरिंन आणि लव्हींग अंदाज बघून प्रेक्षक खूप कमेंट करत आहे. खरंतर जेनेलिया आपल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी स्वतः‌ स्केटिंग करते. परंतु स्केटिंग करता वेळी ती खाली‌‌ पडली होती आणि तिच्या हाताला जखम झाली होती.

हा व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने लिहले आहे की, “काही दिवसांपूर्वी मी स्केटिंग शिकायचे मनावर घेतले. मी असा विचार केला की, मी माझ्या मुलांसाठी प्रेरणा बनू शकते. मी जेव्हा शिकेल तेव्हा मी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करेल असं ठरवलं होतं. पण आता विचार केला की, मला हा पण व्हिडिओ शेअर केला पाहिजे. सोशल मीडियावर आपल्या यशाची कहाणी सगळेच शेअर करतात. पण जेव्हा आपण असफल होतो तेव्हा मात्र याचा कोणी उल्लेख देखील करत नाही. अनेक वेळा आपल्याला उंच उडायच्या आधी जमिनीवर यावे लागते. मला दुखापत होऊनही मी हार नाही मानली आणि तोपर्यंत प्रयत्न करणार जोपर्यंत मला यश मिळणार नाही.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राकेश मिश्रा-महिमा सिंग यांच्या रोमांसने प्रेक्षकांना लावले वेड, ‘कुँवारे से पवित्तर बानी’ गाणं होतंय जोरदार व्हायरल!

-बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर

-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

हे देखील वाचा