Tuesday, February 18, 2025
Home अन्य सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू सध्या आपल्या दोन चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहेत. ‘सरकारू वारीपाटा’ आणि ‘मेजर’ त्याच्या या दोन चित्रपटांची सर्वत्र चर्चा पसरली आहे. तसेच त्याचे चाहते देखील त्याचे हे चित्रपट बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. त्याच्या सरकारु वारीपाटा या आगामी चित्रपटात त्याच्या भूमिकेची झलक त्याने प्रेक्षकांना आधीच दिली आहे. आता त्याने मेजर चित्रपटाची झलक देऊन प्रेक्षकांना सरप्राईझ दिले आहे. नुकताच त्याने मेजर या चित्रपटाच्या टिझरची काही सेकंदाची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. त्याने हा टिझर रिलीझ करत 26/11 रोजी झालेल्या हल्यात शहीद झालेल्या ‘संदीप उन्नीकृष्णन’ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अभिनेता अदिवी सेशने टिझर सोबत एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहले आहे की, “ही मेजरची एक छोटीशी झलक आहे, चित्रपटात या महायोद्याची जीवन कहाणी पडद्यावर दाखवली जाणार आहे. हा व्हिडिओ बघा.” काही सेकंदाक्या आर्मी मेजरचा भूमिकेत महेश बाबू आगीमध्ये एकटा दिसत आहे.

त्याने या काही सेकंदाच्या टिझरनंतर त्यांनी संपूर्ण टिझर कधी येणार आहे, याची तारीख देखील सांगितली आहे. त्याने सांगितले की, या चित्रपटाचा संपूर्ण टिझर 28 मार्च 2021 ला रिलीझ होणार आहे. तसेच हा चित्रपट 2 जुलै 2021ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. खास गोष्ट ही आहे की, हा चित्रपट महेश बाबूच्या प्रॉडक्सन हाऊस मधील पहिला चित्रपट आहे.

हिंदी आणि तेलुगु भाषेत बनलेल्या या चित्रपटात अदिवी शेष मेजर उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत आहेत. शशी किरण टिक्का यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात महेश बाबूसोबत शोभिता धुलीपाला आणि सई मांजरेकर या देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार

-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

-अक्षरा सिंगने मारला डोळ्यांचा बाण, तर चाहत्यांच्या हृदयावर झाला जोरदार वार!

हे देखील वाचा