‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला भन्नाट फोटो; पाहा तुम्हाला ओळखता येतोय का?

Sai Tamhankar Shares New Pic Which Can't Recognise


सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आपले ओळखू न येणारे फोटो शेअर करताना दिसतात. या फोटोंमध्ये कधी ते आपला चेहरा लपवतात, कधी पाठी दाखवतात, तर कधी भलतेच काहीतरी करून आपली ओळख उघडपणे सांगत नाहीत. असे बरेच फोटो व्हायरल होत असतात. अशातच नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोण आहे हे ओळखणे खूप कठीण झाले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो इतर कोणाचाही नसून, तो मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून कोणालाही ती सईच आहे, हे ओळखता येणार नाही. हा फोटो शेअर करत तिने #phool #shootmode #lockdownindia अशाप्रकारच्या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

यापूर्वीही सईने अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.

तिने ‘दुनियादारी’ या चित्रपटात साकारलेली ‘शिरीन’ ही भूमिका चांगलीच गाजली. सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘हंटर’, ‘तू ही रे’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट्स’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

आता तिचा नवीन चित्रपट ‘कलरफुल’  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २ जुलैला रिलीझ होणार आहे.

सईने या चित्रपटाचे पोस्टरही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साडीप्रेम पुन्हा आले जगासमोर, साडीमध्ये अतिशय स्टायलिश दिसणाऱ्या अमृताने लावली सोशल मीडियावर आग

-सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या सुंदरतेसमोर बॉलिवूडच्या अभिनेत्रीही आहेत फेल; पाहा नुकत्याच चर्चेत आलेल्या साराचे भन्नाट फोटो

-दक्षिण भारतीय लूक अन् कपाळावर टिळा, अभिनेत्री सनी लिओनी दिसतेय एकदम झक्कास; पाहा फोटो

 


Leave A Reply

Your email address will not be published.