Friday, March 29, 2024

साडीप्रेम पुन्हा आले जगासमोर, साडीमध्ये अतिशय स्टायलिश दिसणाऱ्या अमृताने लावली सोशल मीडियावर आग

अमृता खानविलकर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एका गाजलेले नाव.

अमृताने तिच्या मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वात तिचे नाव कोरले आहे.

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी अमृता सध्या तिच्या साडीमधल्या फोटोंमुळे खूपच चर्चेत आली आहे.

अमृताचे साडीप्रेम तर सर्वश्रुत आहे. अमृता अनेक कार्यक्रमांना साडीमधेच हजेरी लावताना दिसते.

अमृताने नुकतेच तिचे साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तिचा साडीमधला सुंदर लुक फॅन्सना घायाळ करत आहे.

साडीमध्ये अमृता खूप स्टायलिश आणि मादक दिसत आहे.

मलंग, राजी, सत्यमेव जयते अशा हिंदी सिनेमांमध्ये अमृताने भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय तिने नच बलिये या डान्स रियालिटी शोचे विजेतेपद देखील पटकावले आहे.

शिवाय ती मागच्यावर्षी खतरो के खिलाडी या रियालिटी शोमध्ये देखील झळकली होती.

हे देखील वाचा