Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड लॉकडाऊन काळातील ‘हिरो’ सोनू सूदचा खास गौरव! थेट विमानावर झळकला फोटो

लॉकडाऊन काळातील ‘हिरो’ सोनू सूदचा खास गौरव! थेट विमानावर झळकला फोटो

कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी भारतात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये कामासाठी आलेल्या इतर राज्यातील लोकांना समस्येचा सामना करावा लागला होता. परंतु त्यांची समस्या दूर करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला होता. त्याने लाखो कामगारांना आपापल्या घरी बस, रेल्वे आणि विमानाने मोफत पाठवले होते. त्याच्या कामामुळे भारतातूनच नव्हे, तर जगभरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता. परंतु आता त्याने एक नवीन झेप घेतली असून भारतातील एका विमान कंपनीने त्याच्या प्रशंसनीय कामासाठी त्याचा खास पद्धतीने गौरव करण्यात आला आहे.

भारतातील विमान कंपनी स्पाइस जेटने सोनू सूदला सलाम करत आपल्या स्पाइस जेट बोईंग ७३७ विमानावर त्याचा एक मोठा फोटो लावला आहे. या फोटोसोबतच त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक खास ओळही लिहिली आहे. ती अशी की, ‘ए सॅल्यूट टू द सेव्हिअर सोनू सूद.’ याचा अर्थ ‘सोनू सूदला सलाम.’

स्पाइसजेटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट देखील केले आहे. यामधून त्यांनी सोनूला धन्यवाद देत इतरांसाठीही प्रेरणा असल्याचे म्हटले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला की, “ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. यामुळे मला आठवले की, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला आलो होतो, तेव्हा मी एका अनारक्षित तिकीटामार्फत इथे पोहोचलो होतो. आता जेव्हा स्पाइस जेटने मला हा सन्मान दिला आहे, त्यामुळे मला खूप विनम्र वाटत आहे. सोबतच मला अभिमान होत आहे. मी सांगू शकत नाही की, मला किती चांगले वाटत आहे.”

तो पुढे म्हणाला की, “अनेक चाहत्यांचा आशीर्वाद आहे. विशेषत: त्यांचा ज्यांना मी लॉकडाऊनदरम्यान भेटलो. त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी हे सर्व मिळवू शकलो आहे. ते म्हणतात ना की, आभाळाला स्पर्ष करण्यासाठी आले होते आणि आभाळाला गवसणी घालत आहेत.”

विशेष म्हणजे सोनूने लॉकडाऊनदरम्यान केवळ देशभरात अडकलेल्या गरीब व्यक्तींना त्यांच्या घरी पोहोचायला मदत केली नाही, तर उज्बेकिस्तान, रूस, अल्माति, किर्गिस्तान यांसारख्या जगभरातील अनेक ठिकाणांवर अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही देशात परतण्यासाठी मदत केली होती. यासोबतच त्याने यादरम्यान अनेक डॉक्टर्स आणि पुढे येऊन काम करणाऱ्या व्यक्तींचीही मदत केली होती.

सोनूला हा सन्मान मिळाल्यानंतर चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ४७ वर्षीय अभिनेता सोनूने दहा कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी मुंबईतील आपल्या आठ मालमत्ता गहाण ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नाद करायचा न्हाय! सत्तरच्या दशकात ‘या’ अभिनेत्रींनी बिकिनी सीन्स देऊन केले होते सर्वांनाच चकित; हेलनचाही समावेश

-जुन्या आठवणी ताज्या करत नंदिता दासने शेअर केली पोस्ट, पाहा अभिनेत्रीचा ‘थ्रोबॅक’ फोटो, ओळखणेही झाले कठीण

-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड

हे देखील वाचा