Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड सुशांत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल, रियासह इतर ३३ जणांची नावं

सुशांत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल, रियासह इतर ३३ जणांची नावं

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून, २०२० रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणाबाबत बरेच खुलासे झाले होते. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरुच आहे. आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ३३ आरोपींच्या नावाचा समावेश आहे. आरोपपत्रात एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचा जबाबही नोंदवला आहे.

३० हजार पानांचे आरोपपत्र
सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी आरोपपत्र दाखल करण्यासाठी सत्र न्यायालात पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपपत्र ३० हजारांपेक्षा अधिक पानांचं आहे. आरोपींमध्ये  सुशांतची गर्लफ्रेंड रियाचेही नावाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तिचा भाऊ, नोकर, मॅनेजर यांच्यासह ३३ जणांची नावं या आरोपपत्रात आहेत. या प्रकरणाचा तपास करताना एनसीबीने ड्रग्ज पेडलर्ससह इतरांनाही अटक केली होती. १२ हजार पानांच्या आरोपपत्रात २०० पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अनेक साक्षीदारांच्या जबाबाला आधार बनविले आहे.

३३ जणांचा समावेश
या यादीत ३३ जणांचे नाव आहे. यामध्ये सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, जैद वैलात्रा, बासित परिहार, सूर्यदिप मल्होत्रा, कैजान इब्राहिम, अब्बास लखानी, करण अरोरा आणि गौरव आर्या यांच्या नावाचा समावेश आहे.

अभिनेत्रींचे जबाब
या ३३ जणांच्या आरोपपत्रात अनेक अभिनेत्रींचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचा समावेश आहे. त्यांना दोषी ठरवले नाही, तर त्यांचा जबाब आरोपपत्रात ठेवला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अनुराग कश्यप, तापसी पन्नू अडचणीत; तब्बल ६५० कोटींची हेराफेरी, आयकर विभागाला सापडले भक्कम पुरावे

काय सांगता! अनुराग कश्यप आणि तापसी पन्नुच्या संपत्तीचे आकडे ऐकून तुमचेही फिरतील डोळे

ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर सर्वोच्च न्यायालयाची नजर; म्हणाले, ‘पोर्नोग्राफी दाखवली जातेय’

हे देखील वाचा