काय सांगता! अनुराग कश्यप आणि तापसी पन्नुच्या संपत्तीचे आकडे ऐकून तुमचेही फिरतील डोळे


इन्कमटॅक्स डिपार्टमेंटची रेड आतापर्यंत मोठमोठ्या व्यावसायिकांच्या घरावर पडलेली ऐकलं होत. पण चक्क सिने सृष्टीतील काही कलाकारांच्या घरावर रेड पडली आहे. बुधवारी मुंबई आणि पुण्यामध्ये चार कलाकारांच्या घरावर इन्कमटॅक्स डिपार्टमेंटची रेड पडली आहे. यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नु, विकास बहल, मधी मंटना यांच्या नावाचा समावेश आहे.

या रेड नंतर अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू या दोघांच्याही घरात जास्त प्रॉपर्टी सापडल्याचे बोलले जात आहे. याची खमंग चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. असे बोलले जात आहे की, सगळ्यात जास्त संपत्ती अनुराग कश्यप यांचेकडे आहे. 806 कोटीची संपत्ती त्याचाकडे सापडली आहे आणि तापसीकडे 44 कोटीची संपत्ती आहे.

वेबसाईट सीएनॉलेज यांच्या मते, तापसी ही दरवर्षी कमीतकमी 4 कोटी एवढी रक्कम तर नक्कीच कमावते. या सगळ्याचे आकडेवारी काढली तर ती दर महिन्याला 3 लाखापेक्षाही जास्त कमावते. 2019- 2020 मध्ये तापसी एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये चार्ज करत होती. परंतू माध्यमांत आलेल्या काही बातम्यांनुसार ती एका चित्रपटासाठी सध्या 8 कोटी रुपये चार्ज करते.

तेलगू चित्रपटांमध्ये जवळपास 3 वर्ष काम केल्यानंतर तापसीने ‘चश्मे बहादुर’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने बेबी, बदला, सांड की आख, मिशन मंगल, मनमर्जिया, थप्पड या चित्रपटांमध्ये काम केले.

अनुराग कश्यपबद्दल बोलायचे झाल्यास, वेबसाईट सीएनॉलेजच्या मते, एका चित्रपटाच्या दिग्दर्शनसाठी अनुरागला 11 कोटी एवढी रक्कम मिळतात. तो एका वर्षात जवळपास 60 कोटी पेक्षाही जास्त कमाई करतो. त्याचा एक महिन्याचा इन्कम 6 कोटी पेक्षाही अधिक आहे.

अनुराग कश्यप याच्याकडे 4 कोटी रुपयाची एक कार आहे. दरवर्षी तो जवळपास 9.8 कोटी रुपये इन्कमटॅक्स भरत असतो. त्याने ब्लॅक फ्रायडे,गुलाल, बॉम्बे वेलवेट, नो स्मोकींग, देव डि, गैग ऑफ वासुपुर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.