निया शर्मा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला ओळखीचा चेहरा. निया नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड दिसण्यासोबतच अभिनयासाठी देखील ओळखली जाते. निया सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेयर करत असते. नुकतेच तिने तिचे बिकिनी फोटो शेयर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.
निया शर्माने व्हॉलीबॉल सोबत नवीन फोटोशूट केले आहे. तिने या फोटोशूट मधील निवडक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केले आहे. हे फोटो शेयर करताना तिने लिहले की, ‘जेव्हा तुम्ही चुकून ब्रीझरची बाटली अंगावर सांडून घेता.’ गोल्डन आणि ब्लॅक बिकिनी मधील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत. नियाने गोव्यात केलेले हे नवीन फोटोशूट तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. तिच्या या फोटोंना फॅन्सने भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिलेल्या नियाच्या पोज खूप ग्लॅमरस दिसत आहे.
हे पहिल्यांदा नाही की नियाने तिचे बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेयर केले. याआधी देखील तिने तिचा को ऍक्टर रवी दुबे सोबत काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. निया नेहमीच तिचे आयुष्य मोकळेपणाने जगत असते. नियाच्या या फोटोना खूप कमी वेळात लाखो लाईक्स आले आहेत.
नियाने २०१० साली काली: एक अग्निपरीक्षा या मालिकेतून अभिनयाच्या सृष्टीत पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती स्टार प्लसच्या ‘एक हजारो मैं मेरी बेहना है’ मालिकेतील ‘मानवी’ या भूमिकेने. नियाच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाली आणि ती खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले, शिवाय ती खतरो के खिलाडी मध्ये सुद्धा दिसली होती. नियाने ट्विस्टेड या शो द्वारे वेबवर देखील पदार्पण केले आहेत.
नियाला २०१६ आणि २०१७ साली आशियातील सर्वात मादक स्त्री म्हणून घोषित करण्यात आले.










