बॉलीवूड चित्रपटांसाठी हे वर्ष काही खास ठरले नाही, पण वेब सीरिजने नेहमीच लोकांच्या मनावर छाप सोडली. त्यात वेब सीरिजचे पुढचे सिजन येणार म्हणल की प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असत. या वर्षीही अनेक बहुचर्चित वेब सीरिजचे पुढचे सीझन येणार आहेत. चला तर पाहूयात कोणते आहेत ते
मिर्जापुर 3
भारतातील सगळ्यात जास्त गाजलेल्या सीरीजपैकी एक म्हणजे मिर्जापुर या सीरीजचेही दोन सीझन फार हिट ठरले. आता पुढील कहाणी जाणून घेण्यासाठी फैन्स आतुर झाले आहेत. मिर्जापुरचा तिसरा सीझजन (Mirzapur 3) या वर्षी Amazon Primeवर रिलीज होईल.
द फॅमिली मॅन 3
मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) सीरीजये दोन सीझन आधीच रिलीज झाले आहेत. दोन्हीही सीझन जबरदस्त हिट ठरते. आता पुढील भागावर काम सुरू आहे. नक्कीच अपेक्षा आहे की, राज आणि डीकेची फेमस जोडी तिसरा सीझनही सुपरहिट करतील. ही सिरीज Netflixवर आपण पाहु शकता.
पाताल लोक सीझन 2
पाताल लोक सीझन 2, ज्याचा मोस्ट अवेटेड सीरीजच्या यादीत समावेश आहे, ही यावर्षी Amazon Primeवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता जयदीप अहलावतने ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनसाठी करोडोंचे शुल्क घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा हॉटेलचा कर्मचारी झाला स्मिता गोंदकरचा फोटोग्राफर, तेव्हा निघाला ‘असा’ जबराट फोटो
बरेच वर्ष जगापासून लपून रिलेशनशिपमध्ये होती कथा फेम अदिती शर्मा, नंतर केले ‘या’ अभिनेत्याशी लग्न