Monday, June 24, 2024

डिसेंबर महिना धमाकेदार करण्यासाठी येत आहेत ‘या’ वेबसिरीजचे पुढचे भाग

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस क्रेझ वाढतच जात आहे. लॉकडाऊनमध्ये या माध्यमाची लोकप्रियता अधिकच वाढली. या माध्यमाची लोकप्रियता आणि प्रसिद्धी पाहून बॉलिवूडमधील अनेक मोठमोठे कलाकार या माध्यमावर पदार्पण करत आहे. यासोबतच चित्रपट, मालिकांमध्ये फ्लॉप ठरलेल्या कलाकारांसाठी हे माध्यम तारणहार देखील ठरले. यावर्षी आणि मागे काही प्रदर्शित झालेल्या अनेक वेबसिरीजचे पुढील भाग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी २०२१ चा शेवटचा महिना अधिक धमाकेदार बनवण्यातही अनेक बहुप्रतीक्षित वेबसिरीजचे पुढचे भाग प्रदर्शित होणार आहे. एकदा नजर टाकूया या काही बहुचर्चित वेबसिरीजच्या दुसऱ्या भागांवर.

लॉस्ट इन स्पेस :
नवीन महिन्याची दमदार सुरुवात करून देण्यासाठी १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे, लॉस्ट इन स्पेसचा तिसरा आणि शेवटचा भाग. या सिरीजचा पहिला सिझन २०१८ रोजी, दुसरा सिझन २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.

मनी हाईस्ट :
मनी हाईस्ट या सिरीजचा शेवटचा सिझन ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पाचव्या पर्वातील पहिले व्हॉल्युम सप्टेंबर २०२१ मधेच प्रदर्शित झाले होते. यात टोक्योचा मृत्यू दाखवला होता. आता शेवटच्या पर्वात प्रोफेसरला नाइलाजास्तव समोर यावे लागणार आहे.  

इनसाइड इज :
अमेझॉन प्राईमची ही सिरीज तिसरे पर्व घेऊन डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. ही सिरीज मनी हाईस्टला जोरदार टक्कर देणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेट आणि या खेळातील काळ्या गोष्टींवर यात प्रकाश टाकला आहे.

आर्या २ :
सुश्मिता सेनची बहूप्रतिक्षीत आर्या २ ही सिरीज देखील डिसेंबरमध्ये १० तारखेला प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टारची सर्वात यशस्वी असणाऱ्या आर्या या सिरीजचा हा पुढचा भाग असणार असून, नुकताच आर्या २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

द एक्सपेंसेस सेंझेन ६ :
अमेझॉन प्राईमवर या सिरीजचे सहावे पर्व १० डिसेंबरपासून प्रेक्षकांना बघता येणार आहे. ही सिरीज एक भविष्यवाणी सिरीज आहे. यात असे दाखवले गेले आहे की, मनुष्य हे सिस्टममध्ये असलेल्या कोलनियोमध्ये असतात.

द विचर :
१७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर या ऍडव्हेंचर आणि फँटसी सिरीजचा दुसरा सिझन स्ट्रीम होणार आहे. या वेबसिरीजच्या पहिल्या पर्वाला भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

एमिली इन पॅरिस सिझन २ :
कॉमेडी ड्रामा असणाऱ्या या सीरिजचे दुसरे पर्व २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये लिली कोलीस एमिली ही भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा