अमिषा पटेल बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री. आमिषाने २००० साली ऋतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार हैं’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले.
ऋतिक आणि अमिषा या दोघांची ‘कहो ना प्यार हैं’ हा पहिलाच सिनेमा होता. आज वीस वर्षांनी ऋतिक हा बॉलिवूडचा सुपरस्टार झाला असून अमिषा जवळपास इंडस्ट्रीतून गायब झाली आहे.

अमिषाला तिच्या पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत आणि बॉलिवूडमध्ये स्थान मिळून दिले. यानंतर तिला एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे मिळाले. २००१ साली तिचा सनी देओलसोबतच ‘गदर एक प्रेमकथा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
त्यानंतर तिचा तिसरा हिट सिनेमा म्हणजे बॉबी देओल आणि अक्षय खन्ना अभिनित ‘हमराज’. तीन सिनेमे लागनार हिट देऊनही आज अमिषा बॉलिवूडपासून खूप लांब गेली आहे.
अमिषाने तिच्या २० वर्षाच्या करियरमध्ये लहान मोठ्या एकूण चाळीस सिनेमात काम केले. मात्र आता अमिषा फक्त शाळांच्या वार्षिक महोत्सवात, खेळांच्या बक्षीस वितरण समारंभात दिसते. चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी अमिषाला बोल्ड फोटोशूटचा देखील सहारा घ्यावा लागला होता. मात्र ते करूनही तिला चित्रपट मिळाले नाही.
अमिषाने २००५ साली आमिर खानच्या ‘मंगल पांडे’ सिनेमातही काम केले. २००७ साली तिचा ‘हनिमून ट्रॅव्हल प्राइवेट लिमिटेड’ चित्रपटातही तिने उत्तम अभिनय केला. मात्र, सहायक भूमिका मिळायला लागल्याने तिने तिचा मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला. पण तिथेही तिला यश मिळाले नाही.
अमिषाचे खासगी जीवनही कमी चर्चेत नव्हते. अमिषाचे तिच्या आई, वडिलांसोबत बिलकुल पटत नाही. अमिषा आणि तिच्या वडिलांचा संपत्तीवरून बऱ्याच वर्षांपासून वाद सुरु आहे. अमिषाने तिच्या वडिलांवर १२ करोड रुपये हडपल्याचा मोठा आणि गंभीर आरोप लावला आहे. अमिषाने याबाबत मीडियामध्ये सांगितले होते की, तिच्या वडिलांनी या पैशाचा गैरवापर केला आहे.

अमिषा आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट हे देखील काही काळ रिलेशनशिपमध्ये होते त्यांच्या या नात्यावरून अमिषा आणि तिच्या कुटुंबामध्ये खूप वाद झाले. पाच वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. या नात्यामुळे अमिषाच्या घरात खूप भांडण होऊ लागली मीडिया रिपोर्टनुसार अमिषाला तिच्या आईने चप्पलांनी मारून घराबाहेर काढले होते. एवढे होऊनही अमिषा आणि विक्रम यांचे नाते संपुष्टात आले.