Saturday, June 29, 2024

ऑल टाईम ब्लॉकबस्टर ‘हम आपके है कौन’ सिनेमाला २७ वर्षे पूर्ण; आता काय करतात त्यातील कलाकार?

बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे असतात, जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात आणि अनेक वर्ष उलटूनही त्यांची क्रेझ, लोकप्रियता बिल्कुल कमी होत नाही. या चित्रपटांनी लोकांच्या मनावर राज्य करताना बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली. अनेक सिनेमे आहेत, ज्यांची नोंद हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘ऑल टाईम ब्लॉकबस्टर’ चित्रपटांमध्ये केली गेली आहे. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे ‘हम आपके हैं कौन.’

हा सिनेमा म्हणजे कुटुंब कसे असावे? आणि त्या कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम कसे असावे? याचे उदाहरण आहे. या चित्रपटाचे नाव जरी उच्चारले, तरी पहिल्या सेकंदापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत डोळ्यासमोर सर्रकन हा सिनेमा जातो. गुरुवारी (५ ऑगस्ट) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २७ वर्ष पूर्ण होत आहे. ५ ऑगस्ट, १९९४ साली सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, मोहनीश बहल, अनुपम खेर, आलोकनाथ, रीमा लागू आदी अनेक कलाकारांचा समावेश असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाची कथा, गाणी, संगीत, अभिनय, नृत्य या सर्वच बाबतीत उजवा ठरलेला हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. सिनेमाला २७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊया या चित्रपटातील कलाकारांबद्दल…

सलमान खान- प्रेम
या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा प्रेम अर्थात सलमान खान आज सर्वात मोठा स्टार झाला आहे. आज त्याच्या नावावर सिनेमे चालत आहेत. शिवाय तो त्याच्या ‘बिग बॉस’ शोमुळे देखील तो खूप चर्चेत आला आहे.

माधुरी दीक्षित- निशा
हा चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितने काम केले होते. तिने निशा ही भूमिका साकारली होती. यात सलमान आणि माधुरी यांची जोडी दाखवण्यात आली होती. या सिनेमांनंतर माधुरीची लोकप्रियता अधिकच वाढली. या चित्रपटातील तिचा डान्स, तिची वेशभूषा खूपच गाजली. आज माधुरी चित्रपटांसोबतच काही शोमध्ये परीक्षक म्हणून दिसते.

रेणुका शहाणे-पूजा
या सिनेमात रेणुकाने पूजा ही भूमिका साकारली होती. रेणुकाने सलमानच्या वहिनीची, तर माधुरीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यात पूजाचा मध्यंतरानंतर मृत्यू होतो. मात्र, एक उत्कृष्ट सून असणारी पूजा सर्वांनाचं भावली. आज रेणुका हिंदीसह, मराठीमध्ये देखील सक्रिय आहे. या सिनेमाला २७ वर्ष पूर्ण झाल्याने तिने एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

मोहनीश बहल- राजेश
या सिनेमात मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची आणि पूजाच्या पतीची भूमिका साकारली होती. आज मोहनीश हा प्रसिद्ध अभिनेता असला, तरीही त्याला अपेक्षित यश येथे मिळाले नाही. तो प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचा चिरंजीव आहे.

अनुपम खेर- प्रोफेसर सिद्धार्थ चौधरी
या चित्रपटात अनुपम खेर यांनी माधुरी आणि रेणुका यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांना पॅरालिसिसचा अटॅक देखील आला होता. आज अनुपम अतिशय प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जातात.

रीमा लागू- मधुकला चौधरी
रीमा यांनी अनुपम यांच्या पत्नीची आणि माधुरी- रेणुकाची आईची भूमिका साकारली होती. मराठी चित्रपटांपासून सुरुवात करणाऱ्या रीमा यांनी हिंदीमध्ये देखील त्यांचे नाव तयार केले. राजश्रीच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. २०१७ साली हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

लक्ष्मीकांत बेर्डे- लल्लू
मराठीच चित्रपटातील कॉमेडी किंग असणाऱ्या लक्ष्मीकांत यांनी या सिनेमात घरातल्या प्रामाणिक नोकराची आणि सोबतच सलमानच्या मित्राची भूमिका साकारली. त्यांना या सिनेमाने हिंदीत मोठे यश मिळवून दिले. २००४ साली त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

आलोकनाथ- कैलाशनाथ
आलोकनाथ यांनी या चित्रपटात सलमान आणि मोहनीश यांच्या काकांची भूमिका साकारली होती. आलोकनाथ हे देखील राजश्रीच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले होते.

त्यांच्यावर ‘मी टू’चे आरोप देखील झाले आहेत. त्यांनी चित्रपटांसोबतच मालिकांमध्ये देखील काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा