अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’


सध्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांची मुलगी वामिकासोबत इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. लवकरच इंडिया आणि इंग्लंडमध्ये क्रिकेटची सिरीज रंगणार आहे. त्यासाठीच टीम इंडिया तिथे त्यांच्या कुटुंबासोबत पोहचली असून, या ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

मागील बऱ्याच काळापासून अनुष्का मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मात्र ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून फॅन्सच्या संपर्कात असते. अनुष्का जरी चित्रपटांची शूटिंग करत नसली, तरी ती जाहिरातींचे शूटिंग करताना दिसते. अलिकडेच अनुष्का आणि विराट या दोघांनीसोबत लक्स साबणाची जाहिरात शूट केली आहे. (Anushka Sharma Romantic Chemistry With Virat Kohli video viral)

या जाहिरातीचा व्हिडिओ विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, हा व्हिडिओ तुफान गाजत आहे. हा व्हिडिओ जर आपण पाहिला, तर या व्हिडिओमध्ये या दोघांची जबरदस्त केमेस्ट्री दिसत आहे. त्यांच्या केमेस्ट्रीसोबतच या दोघांचा लुक देखील खूपच आकर्षक आणि सुंदर आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्काने गुलाबी रंगाचा सॅटिन स्लिप ड्रेस घातला असून, हा ड्रेस आणि हा रंग तिच्यावर खूपच खुलून दिसत आहे.

लक्स साबणाच्या या प्रमोशनल जाहिरातीची टॅग लाईन ‘चांद सा रोशन चेहरा’ आहे. विराट आणि अनुष्का या जाहिरातीमध्ये या गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना विराटने अनुष्काची खूप स्तुती केली आहे. या जाहिरातीमध्ये विराट आणि अनुष्काला पाहून त्यांच्या फॅन्सला खूप आनंद झाला असून, तशा कमेंट्सही या व्हिडिओवर येत आहे.

याआधी देखील अनेक जाहिरातींमध्ये विराट अनुष्काने सोबत काम केले आहे. किंबहुना जाहिरातीच्या शुटींगच्या निमित्तानेच या दोघांची पहिली भेट झाली होती. या व्हिडिओमध्ये त्यांचे एकमेकांबद्दल असणारे प्रेम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. अनुष्का आणि विराटसोबत अतिशय सुंदर दिसत असून, त्यांची जोडी खरंच एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.