Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड ‘मॅम एअरपोर्टवर साडी नेसून या’, पॅप्पराजीच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली ‘जिद’ फेम श्रद्धा दास

‘मॅम एअरपोर्टवर साडी नेसून या’, पॅप्पराजीच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली ‘जिद’ फेम श्रद्धा दास

बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या ड्रेसमुळे चर्चेत असतात. कारण सामान्य जनता अनेकवेळा त्यांची स्टाईल कॉपी करत असतात. मग ती वेस्टर्न स्टाईल असो किंवा भारतीय. त्यांचे चाहते त्यांना ड्रेसबाबत नेहमीच फॉलो करत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा दास हिच्याकडे पॅप्पराजींनी एक पोशाख परिधान करावा अशी विनंती केली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून श्रद्धा दासचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. श्रद्धा नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रद्धा चालत येत असते. तिने ग्रे कलरचा सूट घातलेला दिसत आहे. तसेच सगळे केस वर बांधलेलं आहेत. तिने कोरोना नियमांचे पालन करून मास्क लावलेला आहे. ती येते तेव्हा पॅप्पराजी तिला म्हणतात की, “श्रद्धा मॅम तुम्ही साडी घालत जा. साडीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसता.” यावर ती उत्तर देत की, “आता विमानतळावर साडी नेसून येऊ का?” यावर ते तिला ‘हो’ असे म्हणतात. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CSDsRDTqc9r/?utm_source=ig_web_copy_link

यात सर्वात खास म्हणजे श्रद्धाने देखील तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला असं वाटत आहे की, मी उद्या एअरपोर्टवर जाताना साडी नेसली पाहिजे.” तिच्या या व्हिडिओवर चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. यातीलच तिच्या एका चाहत्याने कंमेंट केली आहे की, “तुम्ही साडी नेसल्यावर नाही, साडी तुमच्यावर सुंदर दिसते.” यासोबतच तिचे अनेक चाहते या पोस्टवर कंमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. (shraddha das spotted on airport, paprazzi said mam you should wear a saree)

श्रद्धा दास हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘एक मिनी कठ्ठा’, ‘जिद’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘पार्टनर’ यासारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच तिने तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा