Friday, March 29, 2024

कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

कलाकार आणि त्यांचे सोशल मीडियावरील व्हिडिओ नेहमीच फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरतो. या व्हिडिओंमधून कलाकार लोकप्रियता आणि प्रसिद्धी तर मिळवतात, सोबतच अशा व्हिडिओचा वापर आता प्रमोशनसाठी देखील केला जातो. कलाकारांचे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होतात आणि त्यांना या व्हिडिओमुळे प्रसिद्धीसुद्धा मिळते. कपिल शर्मा आणि भारती सिंग हे दोघं म्हणजे कॉमेडीचा राजा आणि राणी आहेत. या दोघांनी त्यांच्या कॉमेडीने फॅन्सच्या मनामध्ये मोठी जागा मिळवली आहे. लवकरच हे दोघं कपिल शर्मा शोमध्ये सोबत दिसणार आहे. नुकताच या दोघांचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारती आणि कपिल एका ओपन टॉप कारमध्ये बसलेले दिसत असून, ते पावसात त्यांची लॉंग राइड एन्जॉय करत असून, मधेच रस्त्यात एका ठिकाणी थांबतात. तेव्हा भारती सध्या जोरदार ट्रेेंडिंगमध्ये असणारे ‘बचपन का प्यार’ हे गाणे गाताना दिसते. हे गाणे गात असताना तिथे या दोघांची एक फॅन येते. भारती तिला पाहून कॅमेरा तिच्याकडे करते, मात्र कॅमेरा पाहून ती महिला फॅन लगेच तिचा चेहरा बाजूला करत पळते. तिला पाहून भारती आणि कपिल जोरात ओरडून बोलतात की, “ए जानेमन, कुठे पळत आहेस? थांब… थांब फोटो तर काढून घे यार.” तेव्हा ती फॅन जोराजोरात हसते.

कपिलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, “फॅन्ससोबत केलेली मस्ती.” कपिल नेहमीच त्याच्या फॅन्ससोबत अशी मस्ती आणि मजा करताना दिसतो, याचे अनेक व्हिडिओ आधी देखील व्हायरल झाले आहे. (Kapil Sharma and Bharti Singh scare fan away with Bachpan Ka Pyaar song )

नुकतेच कपिल शर्माने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन पर्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे तो सतत लाइमलाइटमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी कपिलचा शो काही काळापुरता बंद झाला होता. मात्र आता पुन्हा नव्या जोशात, नव्या कलाकारांसह, नवीन मस्ती धमाल करत हा शो सुरु होत आहे. या शोचा नवीन प्रोमो देखील लॉन्च करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये कपिल शर्मा शोची संपूर्ण टीम कोरोनाची लस घेऊन मगच शो करत असल्याचे सांगत आहे. सोबतच ज्या लोकांनी दोन्ही लशी घेतल्या आहेत, त्यांना प्रेक्षक म्हणून शोमध्ये उपस्थित राहता देखील येणार असल्याचे प्रोमोमधून समजत आहे. हा शो पुन्हा सुरु होणार असल्याने फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पर्वात कपिल शर्मासोबतच कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, भारती सिंग, कीकू शारदा हे कलाकार दिसणार आहे. या पर्वात अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला घेणयात आले नाहीये. सुमोना या शोमध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसायची. या सर्वांसोबत नक्कीच अर्चना पुरण सिंग देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा