टायगर श्रॉफला विचारला गेला व्हर्जिनिटीबाबत प्रश्न; अभिनेता म्हणाला, ‘मी देखील सलमान भाईप्रमाणे…’


कलाकार म्हटल्यावर त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते, सगळा प्रेक्षक वर्ग उत्सुक असतो. अनेकवेळा कलाकार देखील त्यांच्याबाबत गोष्टींचा खुलासा करत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याने त्याच्याबाबत एका गोष्टीचा खुलासा केला आहे. अभिनेता अरबाज खानचा शो ‘पिंच सिझन २’ यातील तिसऱ्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाहुणा म्हणून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ दिसत आहे. या शोचा होस्ट अरबाज खान टायगरला ट्रोलिंग आणि व्हर्जिनिटी बाबत अनेक प्रश्न विचारतो. टायगर देखील या सगळ्या प्रश्नांची अगदी मजेशीर अंदाजात उत्तरं देतो. हा शो नुकताच २१ जुलैला सुरु झाला आहे. हा शो सध्या जोरदार चर्चेत आहे.

जवळपास एका मिनिटाच्या या प्रोमो व्हिडिओमध्ये अरबाज खान टायगरला काही प्रश्न विचारतो. या शोमध्ये टायगरने सांगितले की, करिअरमध्ये त्याच्या लूकवरून त्याला नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याने सांगितले की, “रिलीझ होण्याआधीच मला माझ्या लुक्सवरून खूप ट्रोल केले होते. लोक म्हणायचे की, हा हिरो आहे की हिरोईन? हा अजिबात जॅकी दादाच्या मुलाप्रमाणे दिसत नाही.” (arbaaz khan asked a quetion on virginity to tiger shroff in pinch 2 )

एका ट्रोलरचा प्रश्न वाचत अरबाज म्हणाला की, “तुझ्याकडे सगळं काही आहे पण दाढी नाहीये.” यावर दाढीकडे इशारा करत टायगर म्हणाला की, “हे काय आहे भावा? जर तुम्हाला ट्रोल करत असतील, तर ते केवळ यासाठी की, कारण तुम्ही त्यांना प्रभावित करत आहात. मी आज जे काही आहे ते केवळ प्रेक्षकांमुळे आहे. माझ्यासाठी तेच महत्वाचे आहेत.” टायगरला जेव्हा व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला , “मी देखील सलमान भाई प्रमाणे व्हर्जिन आहे.”

यावेळी ‘पिंच २’ मध्ये अरबाज खानचे पाहुणे अनन्या पांडे, कियारा आडवाणी, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ, राजकुमार राव आणि फराह खान असणार आहे. एका मुलाखतीत अरबाजने सांगितले होते की, पिंचचा दुसरा सीझन खूपच मोठा आणि बोल्ड असणार आहे. सलमान खानला पहिल्या सीझनमध्ये जाणूनबुजून बोलावले नव्हते, कारण त्याला वाटत होते की, त्याला बोलवायचा आधी शो त्याच्या नियमांवर यशस्वी व्हावा.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक


Leave A Reply

Your email address will not be published.