Wednesday, December 3, 2025
Home मराठी मिताली मयेकरच्या कातिल अदांनी चाहत्यांना लावले वेड; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया

मिताली मयेकरच्या कातिल अदांनी चाहत्यांना लावले वेड; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच यासाठी त्यांना खूप काळ लागला या आहे. परंतु, अगदी कमी कालावधीत आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही. पण तरी देखील आज ती खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. अवघ्या २४ वर्षाच्या मितालीने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

मिताली मयेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मिताली अत्यंत हॉट दिसत आहे. यामध्ये तिने ग्रे कलरचा बॅकलेस ड्रेस परिधान केला केला आहे. तिचा हा ड्रेस वर्क केलेला आहे. यामध्ये तिची अत्यंत कातिल अदा दिसत आहेत. हा फोटो शेअर करून तिने “तुमची इच्छा” असे कॅप्शन दिले आहे.

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. अशातच गायिका जुईली जोगळेकर हिने फायर इमोजी पोस्ट केली आहे तर रोहित राऊत याने “बरं बरं बरं” अशी कंमेंट केली आहे. तर गायत्री दातार हिने देखील कंमेंट केली आहे. तसेच तिचे चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. (marathi actress mitali mayekar share her glamrous photo on social media)

मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’,’घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. तिने याच वर्षी तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. तो देखील एक अभिनेता आहे. तो सध्या स्टार प्रवाहावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा